करंदी तर्फ कुडाळ येथील विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन

करंदी (जावली) : करंदी तर्फ कुडाळ येथील विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारत बांधकामचे भूमिपूजन तालुक्याचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुंबरे व जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. मा.मानकुमरे भाऊ आणि श्री.रांजणे साहेब यांच्या हस्ते इमारतीच्या जागेवर पूजन करून कुदळ मारण्यात आली जावली तालुक्यातील सहकार मजबूत होत असतानाच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व विकास सेवा सोसायटीमध्ये अत्याधुनिकरण करून तालुक्यातील शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून शेती मार्गदर्शन त्याचबरोबर पीक कर्ज व इतर आर्थिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील विकास सेवा सोसायटी ह्या शेतक-यांसाठी अर्थवाहिनी बनाव्यात असा विश्वास तालुक्याचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे (भाऊ) यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे सभापती श्री.जयदीप शिंदे श्री.संदीप परामने सोसायटीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.


न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / करंदी (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने