भैरवनाथ गोविंदा पथक जवळवाडी तसेच श्रीकृष्ण गोविंद पथक मेढा ठरले मानकरी
प्रतिनिधी : संजय वांगडे
मेढा (जावली) : अंकुश (बाबा) कदम युवा फाउंडेशन आयोजित जावलीच्या स्वाभिमानाची दहीहंडी अलोट गोविंदा प्रेमीच्या उपस्थितीत पार पडली या दहीहंडीचे मानकरी भैरवनाथ गोविंदा पथक जवळवाडी तसेच श्रीकृष्ण गोविंद पथक मेढा हे ठरले.
मेढा येथे दहीहंडी उत्सवानिमित्त अंकुश बाबा कदम यांनी "जावलीच्या स्वाभिमानाची हंडी" आयोजित केली होती या दहीहंडी उत्सव हजारो युवक,युवती, महिला यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अमित दादा कदम,एस.एस.पार्टे गुरुजी ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधू चिकणे, उपाध्यक्ष विलास दुंदळे, विठ्ठल पवार, प्रतापगड कारखाना संचालक आनंदराव जूनघरे,सचिन जवळ,सचिन करंजेकर,व्यसनमुक्त संघाचे विलास बाबा जवळ,श्री. सतीश मर्ढेकर, पत्रकार सुरेश पार्टे,सोमनाथ साखरे, दत्ता पवार, विजय सपकाळ, जितीन वेंदे, विश्वनाथ डीगे तसेच दक्षिण विभागातील विविध गावचे सरपंच-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी एकूण दहा गोविंदा पथकांनी "जावलीच्या स्वाभिमानाची हंडी" फोडण्यासाठी हजेरी लावली होती.यामध्ये महिलांच्या गोंविंदा पथकाने सर्वांचे अधिक लक्ष वेधून घेतले.तर दही हंडी फोडण्याचा मान मेढा गोविंदा पथक व जवळवाडी गोविंदा पथकाने पटकाविला.या दोन्ही गोविंदापथकांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जावलीतील हजारो युवक,नागरिक, महिला या दहीहंडी उत्सवास उपस्थित होत्या.
दातृत्व व कर्तृत्व संपन्न अंकुश बाबांनी मेढा येथे आयोजित केलेल्या "जावळीच्या स्वाभिमानाची हंडी" उत्सवाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, एस एस पार्टे गुरुजी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. दहीहंडी महोत्सवाच्या निमित्ताने अंकुश बाबांनी सर्वपक्षीय नेत्यांची जवळीक साधत तालुक्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांना निमंत्रित केले होते.
जावळीचे ऋण फेडयायला आलोय जावळी तालुक्यातील डोंगर कपारीतील मॉलचौडी सारख्या छोट्या गावात जन्म झाला शिक्षण घेऊन मुबंईत नोकरीनिमित्त गेलो पण सध्या तालुक्यात रोजगार नसल्याने युवकांची वाईट परिस्थिती आहे.त्यामुळे या युवकांना समोर ठेवून त्यांच्यासाठी काम करण्याचे व्हिजन घेऊन जावळीचे ऋण फेडयायला आलोय,तालुकावासीयांनी साथ द्यावी अशी भावनिक आशा अंकुश बाबांनी उपस्थित असलेल्या गोविंदा प्रेमी आणि कार्यकर्त्यांना दिली. या कार्यक्रमात प्रसंगी तालुक्यातील अनेकांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला बक्षीस वितरणानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)
