जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या तीन खेळाडूंची निवड

प्रतिनिधी : संजय वांगडे

मेढा (जावली) : आज न्यू इंग्लिश स्कूल बामणोली तर्फ कुडाळ येथे घेण्यात आलेल्या शालेय जावळी तालुकास्तरीय १७ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत पंचक्रोशी विद्यालय मालचौंडी विद्यालयाचा दबदबा कायम असल्याचे दिसून आले. गतवर्षाप्रमाणे यावर्षीही विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

आजच्या १७ वर्षाखालील वयोगटात विद्यालयाच्या खेळाडूंनी प्रलोभनिय कामगिरी करत आपले वर्चस्व राखले.

या स्पर्धेतील विजेते खेळाडू प्रथम पियूष सुर्यकांत लोहार १० वी द्वितीय आर्यन कमलेश भिलारे ९ वी चतुर्थ प्रेम राजेंद्र कदम ९ वी. या स्पर्धेसाठी शिक्षक उदय चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मा. मुख्याध्यापक व स्टाफ पंचक्रोशी विद्यालय मालचौंडी, शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ, पंचक्रोशी परिसर सरपंच व ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले


न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / मेढा (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने