प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबी कर्मचारी वर्गाकडून ९ ऑगस्ट रोजी झालेल्या घटनेचा काळी फीत बांधून केला जाहीर निषेध

प्रतिनिधी : संजय वांगडे

कुसुंबी (जावली) : आर जी कर मेडिकल कॉलेज कलकत्ता येथे हॉस्पिटल मध्ये रात्रीच्या सुमारास प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर वरती झालेला बलात्कार व निर्घुन हत्या ह्या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील सुजाण नागरिक यांनी काळीफित बांधून तीव्र निषेध व्यक्त केला आहे...

अमानुषपणे झालेली मारहाण,बलात्कार व हत्या वरती शासनाने कठोर कारवाई करावी व पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी कठोर कायदा लागू करावा अशी मागणी व्यक्त केली.

रात्री अपरात्री सेवेची अपेक्षा जनतेकडून केली जाते परंतु सेवा देत असताना महिला सुरक्षित नसल्याच्या या घटनेतून स्पष्ट दिसत आहे या घटनेचा जाहीर निषेध करत कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी हाताला काळी फित बांधून आरोग्य सेवा दिली आणि या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला याप्रसंगी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुर जगदाळे सर,डॉ. स्नेहल थोरात मॅडम समवेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.



न्यूज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / कुसुंबी (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने