प्रतिनिधी : संजय वांगडे
समाज ऋणातून मुक्त होण्याचा असाही एक मार्ग
मेढा (जावली) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचा मोठा प्रयत्न .,
दरवर्षी प्रमाणे या ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निझरे येथील मुलांना शैक्षणिक साहित्य व स्पोर्टस् च्या किट चे वाटप करण्यात आले.
गेली सहा सात वर्षे लगातार न थांबता घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने ग्रामीण भागातील शाळांमधून शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्य चालू ठेवले आहे .
यावेळी संस्थेचे संस्थापक श्री दत्तात्रय बिरामणे यांच्या वतीने त्यांचे वडीलांच्या हस्ते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
सर्व ग्रामस्थ , पालक व विद्यार्थी यांच्या वतीने या संस्थेस धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
यावेळी श्री वसंत जंगम , श्री राजू शेडगे , श्री युवराज साळुंखे , श्री राजू सापते इत्यादी कार्यकर्ते व निझरे गावचे सरपंच श्री सतिष भिलारे , श्री अमृतलाल शेडगे , श्री विष्णू शेडगे , सौ शकुंतला भिलारे , श्री सुधाकर चिकणे इत्यादी उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री संजय धनावडे यांनी सर्वांचे आभार मानले.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)

