तापोळ्यात प्रवाशांसाठी नवीन तराफा सुरू, प्रवाशांनी केला आनंद व्यक्त

 प्रतिनिधी : संजय वांगडे

तापोळा : शिवसागर जलाशयामध्ये शिवप्रताप तराफ्याच्या सेवेला सुरुवात झाली असून अनेक प्रवाशांनी प्रवास करताना आनंद व्यक्त केला यामुळे कोयना भाग व कांदाटी खोऱ्यातील गावांचा दळवळणाचा प्रश्न सुटला आहे. दरवर्षी पाणी पातळी कमी होत असल्याने तराफा सेवा ही एप्रिल महिन्यात बंद करण्यात येते. मात्र, आता पाणीसाठा झाल्याने तराफा सेवा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

शिवप्रताप तराफा हा बामणोली ते दरे यादरम्यान सुरू होणार होता. मात्र, सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तापोळा लाँच युनिट मार्फत सुरू असणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. यानंतर बोर्डच्या सदस्यांनी सर्व्हिस लाँच व जुन्या तराफ्याची पाहणी केली. यावेळी सुरक्षिततेच्या कारणातून जुन्या लॉन्स न वापरण्याच्या होणार आहे. यामुळे जुन्या तराफ्याच्या दुरूस्तीसाठी बाहेर काढण्यात येणार आहे.

नवीन तराफा तापोळा या ठिकाणी सुरू करण्यात आला असला तरी तो जुना तरफा दुरुस्त होईपर्यंतच त्या ठिकाणी चालवला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात तापोळा व वामणोली येथे ताराफा सेवा या सुरू होऊन कोयना भाग १०५ गावातील लोकांचे दळणवळण सोयीस्कर व सुरळीत होणार आहे.दरम्यान, नवीन शिवप्रताप तराफ्याचे प्राथमिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तापोळा लाँच युनिटमार्फत या परिसरातील दळणवळणासाठी लोकांच्या प्रवासी वाहतुकीकरता तीन नवीन सर्व्हिस लाँच या ठिकाणी दाखल झाल्या आहेत.


न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / तापोळा (महाबळेश्वर)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने