प्रतिनिधी:संजय वांगडे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल! तालुका प्रमुख संतोष चव्हाण.
निवेदन देताना शेतकरी व शिवसैनिक राजाराम अगलावे,संतोष चव्हाण,रामदास इंगुळकर,विकास देशमुख,शंकर जगताप,विठ्ठल जगताप.
कुसुंबी : मेढा जावली तालुक्यातील शेतकरी जंगली जनावरांच्या तावडीत सापडला असून गेल्या कित्येक वर्षांपासून उभी असलेली पिकं जंगली जनावरं नष्ट करत आहेत. याची गंभीर दखल वनविभागाने घ्यायला पाहिजे करंडी तर्फ कुसुंबी दक्षिण विभागातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात रानडुक्करांनी शेतीचे नुकसान केले हे केवळ एकाच शेतकऱ्यांचे नुकसान नसुन असे अनेक शेतकरी जंगली जनावरांच्या त्रासाला वैतागून गेले आहेत भरपाई मागण्या करीता कागद पत्रांची पुरतता सर्व शेतकरी करू शकत नाही कारण वनविभागाने तयार केलेल्या अटी व नियम फारच त्रासदायक असुन. त्यामुळे शेतकरी दुर्लक्ष करतात व संकटाला सामोरे जातात.असे मत वेक्त होत आहे.
वनसंरक्षक अधिकारी.मेढा, ता.जावली जिल्हा सातारा,जावली तालुक्यातील शेतकऱ्यांचे रानटी प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान संपूर्ण जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना रानटी प्राण्यांच्या त्रासामुळे शेती करणे अत्यंत अवघड झाले आहे रानडुक्कर, गवा, वानर व पक्षी मोर, लांडोर या प्राण्यांच्या त्रासामुळे शेतात पेरलेले पिक शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाहीत व शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान होत आहे व आपल्या खात्या मार्फत दिली जाणारी मदत हि शेतकऱ्यांची फक्त फसवणूक आहे. कारण शेतकऱ्यांच्या पेरणी पासून काढणी पर्यंत खर्च जर वाढला तर सरकारी मदत फार अपुरी पडेल व त्याचा कुठेही मेळ बसत नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून शेतकऱ्यांना शेती संरक्षण करिता शेताला सौरऊर्जा झटका जाळीचे कुंपण करून मिळावे अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल व आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करणे भाग पडेल याची वनविभागाच्या वतीने दखल घेण्यात यावी.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुसुंबी (जावली)
