प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
करहर : हातगेघर येथील हातगेघर ते पानस या महू हातगेघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या उर्वरित पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ भाजपा जावलीचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, उपसरपंच शंकर गोळे, माजी सरपंच शिवाजी दीक्षित, माजी उपसरपंच जगन्नाथ गोळे, सर्जेराव गोळे, तुकाराम गोळे, आदी जेष्ठ ग्रामस्त तसेच युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर गोळे, बाळू काशिनाथ गोळे, पि व्ही आर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर ए एस प्रसाद, सुपरवाजर यादव, रामन्ना रेड्डी, राजू रेडी, यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी हातगेघर ग्रामस्थांनी मागणी केलेल्या साईबाबा मंदिर ते माळवीचा ओढा या शेत रस्त्याच्या कामाचाही शुभारंभ पी. व्ही. आर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रसाद सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार सदर दोन्ही कामे युद्ध पातळीवर सुरु असून लवकरात लवकर मार्च एंडिंगच्या पूर्वी महू हातगेघर धरणाच्या दोन्ही कालव्याचे कामं पुर्ण करण्याचे जलसंपदा कृष्णा खोरे चे अधीक्षक अभियंता शिंदे साहेब व व डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता घार्गे यांनी सांगितले.
तसेच हातगेघर उपसा सिंचन योजनेला मार्च महिन्यापूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळण्याचे आश्वासन नामदार बाबाराजेंनी या पूर्वीच हातगेघर ग्रामस्थना दिले आहे. हातगेघर उपसा सिंचन योजनेमुळे धरणाच्या वरील डोंगर भागातील २७० हेक्टर शेत जमिनीस विशेष बाब म्हणून पाणी मिळणार असल्याने हातगेघर ग्रामस्थ खूप आशादायी व उत्साही आहेत.
न्यूज मराठी लाईव्ह
करहर / जावली


Post a Comment