जावली तालुक्यातील दरे बु. येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री मा.आ.छ.शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते


दरे बुद्रुक (ता. जावली): दरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी ग्रामस्थ, पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली-महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, उद्योजक दत्ताशेठ भालेघरे, बाळासाहेब महामूलकर, सरपंच संतोष महामूलकर, बाबू महामूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.


या वेळी ग्रामपंचायतीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच गावाच्या विकासासाठी विविध योजनांवर चर्चा झाली. शिवेंद्रसिंह राजेंनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमानंतर ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.आ.छ.शिवेंद्रसिंहराजे यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांत आणि उत्साही वातावरणात पार पडला.


न्यूज मराठी लाईव्ह 
दरे बुद्रुक / जावली 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने