मेढा नगरपंचायत मध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये रेश्मा विशाल शेडगे यांच्या नावाची वार्ड क्रमांक ४ मधून जोरदार चर्चा.


मेढा (जावली) : नुकतीच निवडणूक आयोगाकडून राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे अशातच मेढा नगरपंचायती मध्ये देखील निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असून इच्छुक उमेदवार तसेच आजी माझी उमेदवार या निवडणुकीमध्ये स्वतःच नशीब आजमावण्यासाठी मोठ्या ताकतीने काम करत आहेत.

अशातच प्रभाग क्रमांक ४ मध्ये रेश्मा विशाल शेडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा मेढ्यात रंगताना पाहायला मिळत आहे.
वेगवेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून मतदारांकडे पोहोचणे मतदारांशी संपर्क ठेवणे तसेच या उमेदवाराने आपल्या नावाला चर्चेच्या प्रवाहात आणून लोकांमध्ये आपली आगळीवेगळी छाप सोडून प्रचारामध्ये यांच्याच नावाची चर्चा ऐकायला मिळते. 

त्यातच प्रभाग ४ सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. तसेच रेश्मा विशाल शेडगे या शिक्षित असून प्रभागासाठी नक्कीच काम करू शकतात अशी आशा मतदारांमध्ये पाहायला मिळते. सर्वसामान्य जनतेतून यांच्या नावाची चर्चा रंगल्याने नक्कीच ही निवडणूक सोपे जाईल की काय असे चिन्ह पाहायला मिळते 
मतदारांनाही हुशार आणि लोकांचे प्रश्न समजून घेणारा नगरसेवकांची अपेक्षा आहे अशातच हा नवखा चेहरा असल्याने मतदारांचा कल झुकताना पाहायला मिळत आहे.

राजकीय पार्श्वभूमी 
रेशमा शेडगे यांच्या सासू सौ.शोभा श्रीरंग शेडगे या मेढा ग्रामपंचायत मधून प्रचंड बहुमताने निवडून आल्या होत्या. त्यांचाही जनसंपर्क चांगलाच असून रेश्मा शेडगे यांचे पती श्री.विशाल श्रीरंग शेडगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष काम करत आहेत तसेच जय भवानी मंडळाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहेत. याचाही फायदा रेश्मा शेडगे यांना निवडणुकीमध्ये होणार आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचा आशीर्वाद
प्रभाग क्रमांक ४ मध्ये रेश्मा विशाल शेडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा मेढ्यात रंगताना पाहायला मिळत आहे. कारण मा.बांधकाम विभाग मंत्री छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले (महाराज साहेब) यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4 मद्ये त्यांचे पारडे जड आहे. महाराज साहेब त्यांचा नक्की विचार करतील अशीच चर्चा सर्वदूर सूरू आहे.



न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post