यूट्यूब पत्रकार किरण प्रकाश मोरे दोन वर्षांसाठी पुणे व सातारा जिल्ह्यातून हद्दपार; उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी वाई यांचा आदेश


शिरवळ (खंडाळा) : शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत राहणारे यूट्यूब पत्रकार किरण प्रकाश मोरे (वय ३७, मुळ गाव कर्नावड ता. भोर, जि. पुणे, सध्या रा. सटवाई कॉलनी, शिरवळ) यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वाई डॉ. योगेश खरमाटे यांनी दिले आहेत.

मोरे यांच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून—

गु. र. नं. ५६/२०२२, भादंवि कलम ३५४, ३२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४

गु. र. नं. २५५/२०२४, BNS कलम ३०८(२), ३५२, ३५१(२)(५)

मु. र. नं. ३१०/२०२४, आयटी अ‍ॅक्ट ६७(अ)


सदर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, तसेच सततच्या गैरकृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलीस विभागाच्या तपासात निष्पन्न झाले. मोरे यांना सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तवणुकीत कोणताही बदल दिसून न आल्याने हद्दपारीचा प्रस्ताव शिरवळ पोलीस ठाण्यातून पाठविण्यात आला होता.

हा प्रस्ताव सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, आणि फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला. चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी आपल्या शिफारशी सादर केल्यानंतर, डॉ. योगेश खरमाटे यांनी आदेश क्र. एम.ए.जी./हद्दपार/एस.आर./०३/२०२४, दिनांक १२/११/२०२५ अन्वये दोन वर्षांसाठी हद्दपारी लागू केली.

सदर कारवाईत शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की हद्दपार केलेला इसम किरण प्रकाश मोरे, तसेच त्याचे साथीदार विशाल महादेव जाधव व इरफान दिलावर शेख यांनी कोणाकडून धमकी देऊन रोख रक्कम किंवा वस्तूंची मागणी केल्यास, निर्भयपणे शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
खंडाळा / शिरवळ

Post a Comment

Previous Post Next Post