राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष कारंडे यांचा शिवसेनेत प्रवेश....

प्रतिनिधी : बजरंग चौधरी

सातारा (कास) : दि.१५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ऐन धामधुमीत राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष सुभाष कारंडे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश कदम आदींसह मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. कार्यकर्त्यांमुळेच शिवसेना जनसामान्यांचा पक्ष असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा भगवा सर्वत्र फडकावला जाईल.  

या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची महाबळेश्वर तालुक्यातील कमी झाली असून शिवसेनेला मात्र तापोळा विभागात मोठे बळ मिळणार आहे. सुभाष कारंडे हे तापोळा विभागातील एक सक्रिय नेतृत्व असून त्यांचा समाजकारण, राजकारण यात मोठा अनुभव आहे. १९८८ साली तापोळा येथे त्यांचे वडील लक्ष्मणराव कारंडे व चुलते रामचंद्र कारंडे यांनी विशाल बोट क्लब मागासवर्गीय सहकारी संस्थेची स्थापना करून कोयना जलाशयातील बोट व पर्यटन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. 

त्यानंतर या संस्थेची धुरा सुभाष कारंडे यांनी समर्थपणे सांभाळत आपली समाजकारण चालू केले. १९९५ साली आपल्या राजकारणाची सुरुवात तत्कालीन शिवसेना आमदार सदाशिवराव सपकाळ व तानाजी धुमाळ यांच्या नेतृत्वात करत चांगले कार्य केले त्यानंतर १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ साली त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

तेव्हापासून ते आतापर्यंत ते राष्ट्रवादीतच आहेत. राष्ट्रवादी पक्षात दोन गट झाल्यानंतरही त्यांनी पक्षाचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले. परंतु सद्य परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना भागासह महाबळेश्वर तालुक्यात केलेल्या अनेक विकास कामांमुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

न्यूज मराठी लाईव्ह 
सातारा

Post a Comment

Previous Post Next Post