प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
मेढा / जावली
मेढा (जावली) : दि. २२ श्री. छ.शिवाजी महाराज मैदानावर आज खेलो सातारा स्पर्धा पार पडल्या. खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती वाढीस लागून शारिरीक विकासाबरोबर शिक्षणाची आवड निर्माण होते,असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे यांनी केले.
खेलो सातारा प्रकल्पांतर्गत निवासी क्रीडा कॅम्पसाठी बीटस्तरीय विद्यार्थी निवड चाचणी आय एस ओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संपन्न झाली.
शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख दत्तात्रय बाचल,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय धनावडे, उपाध्यक्ष बजरंग चौधरी विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक यांचे उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. धावणे, थाळी फेक, गोळा फेक, लांब उडी, योगासने, बुद्धीबळ, कुस्ती या खेळांच्या स्पर्धा झाल्या.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली


टिप्पणी पोस्ट करा