तिकीटाचे राहिलेले पैसे सुट्टे घेण्यासाठी एस.टी. कंडक्टरने दापंत्याला पाठवले थेट एस.टी.आगारात



68₹ रुपये मेढा डेपोतून आणण्यासाठी पुन्हा दापत्यांला 150₹ रुपये गाडीला खर्च करूनही 68₹ रुपये मिळाले नाहीत.

कुडाळ (जावली) : तालुक्यातील रानघेघर येथील विजय गंगावणे व त्यांच्या पत्नी हे दोघे रानगेघर ते पाचवड एस.टी. बस ने सकाळी साडेनऊ वाजता सोमर्डी या ठिकाणी सरकारी दवाखान्यात निघाले होते. रानगेघर ते सोमर्डी ची दोघांची 32₹ रुपये तिकीट झाली या दापत्यांन वाहक इंब्राहिम आतार यांना तिकिटासाठी त्यांच्याजवळ सुट्टे पैसे नसल्याने पाचशे रुपयांची नोट दिली, वाहकांन त्यांना 400₹ रुपये मागारी दिले व 68₹ रुपये नंतर देतो असे सांगितले थोडया वेळाने पुन्हा विजय गंगावणे यांनी राहिलेले 68₹ रुपये मागितले असता माझ्याकडे सुट्टे नाहीत असे उद्दट बोलत तिकिटीच्या मागे 68₹ रुपये लिहून राहिलेले पैसे मेढा डेपोतून घ्यायला लावले.
   

सदर व्रद्ध दापंत्य तक्रार देण्यासाठी कुडाळ येथे कंट्रोलर ला भेटले व वाहका विरोधात तक्रार अर्ज दिला असता त्या वाहकाने पुन्हा एकदा विजय गंगावणे या व्रद्धाला तुला कुणाला तक्रार द्यायची ती दे मी कुडाळचा आहे तुझ्याकडे बघतोच असा दम खुद्ध कुडाळ एस टी कंट्रोलर समोरच दिला. सदरची तक्रार देण्यासाठी विजय गंगावणे यांनी मेढा डेपोला आठ ते दहा वेळा लँड लाईन ऑफिस च्या नंबर वर कुडाळ मधून अनेकवेळा फोन केले असता मेढा आगार येथील ऑफिस मध्ये उचलला गेला नाही. त्यामुळे विजय गंगावणे हे थेट कुडाळ इथून मेढा डेपोत तिकिटाचे राहिलेले 68 रुपये तसेच वाहका विरोधात तक्रार देण्याकरिता मेढा आगार येथे पोचले असता त्यांच्या तिकिटाचे उरलेले 68 रुपये वाहकाने मेढा डेपोत जमाही केले नाहीत अशी माहिती त्यांना समजली.
     
अनेकदा प्रवाशांशी सुट्ट्या पैशावरून वाहक इंब्राहिम आतार मेढा आगाराचा वाहक असाच उद्धट अरेरावीने वागत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवासी बोलत असून त्याच्या भीती पोटी प्रवासी तक्रार द्यायला भीत आहेत. सदर वाहकामुळे दापत्यांला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करायला लागला, 68₹ रुपये मेढा डेपोतून आणण्यासाठी पुन्हा दापत्यांला 150₹ रुपये गाडीला खर्च करूनही 68₹ रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांचे सुट्टे पैसे मागारी न देणाऱ्या वाहकावर योग्य ती कार्यवाही व्हावी व दापंत्याला न्याय द्यावा अशी मागणी रिपाईचे जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी केली असून कार्यवाही चे निवेदन एस टी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब यांना पाठवले आहे. मुजोर एस टी वाहकावर चौकशी करून योग्य ती कार्यवाही झाली नाही तर रिपाई मेढा आगारासमोर आंदोलन करणार असा इशारा रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे व विजय गंगावणे यांनी दिला आहे.







न्युज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post