श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / जावली (सातारा)
सातारा : कळत नकळत मराठी भाषेवर होणारा अन्याय तसेच महाराष्ट्राचे हिंदीकरण आणि मराठीची कुचंबणा थांबवा असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले आहे देशात भाषिक प्रांतरचना अस्तित्वात आणताना १९५६ पूर्वी गुजरात आणि मुंबई असे मिळून एकच मुंबई राज्य होते. मुंबई या मराठी व गुजराती द्विभाषिक राज्यात गुजरात मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा प्रदेश होता. आजचा मराठवाडा यामधील पूर्वीचे सहा जिल्हे (पूर्वाश्रमीचा औरंगाबाद मधून झालेला जालना व परभणी मधून झालेला हिंगोली) असे सहा जिल्हे हे तेलगू उर्दू मराठी त्रिभाषिक भाषिक प्रदेश आंध्र प्रदेशात होते. विदर्भ म्हणजे आजच्या मध्य प्रदेशात सी पी बेरार हिंदी व मराठी प्रदेशात मध्ये होता.
भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव कारवार बिदर भालकी सह ८६५ मराठी गावे कर्नाटकला जोडली गेली. आपल्या महाराष्ट्रात बेळगाव सीमा वासीय यांचा महाराष्ट्रात येण्याचा लढा आणि खंडकरी शेतकऱ्यांचा लढा हे अनेक दशके चालले.मुंबई गुजरातला जोडली जाणार होती तेंव्हा १०७ मराठी हुतात्मे देऊन शेतकरी कामगारांनी लढा देऊन मराठी माणसांचा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आकाराला आला. या लढ्यात तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसचे अनेक नेते संयुक्त महाराष्ट्र समिती च्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढत होते. समितीने हे मराठी माणसांचे महाराष्ट्र राज्य १ मे १९६० अस्तित्वात आले.
आज सत्ताधारी पक्षातील बांधवानी मराठी चा आग्रह धरला पाहिजे.
आपल्या राज्यात अगदी खेड्यापाड्यात पहिल्यांदा राजस्थान या दुष्काळी राज्यातून लोक यायला सुरुवात झाली.नंतर गुजराती व केरळी मुंबईत आले. आता बिहार कलकत्ता पासून ते तामिळनाडू पर्यंत विशेषतः मागास राज्यातून रोजगारासाठी परप्रांतीयांचे महाराष्ट्रात येणे सुरु आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पूर्वी मारवाड भागातून आलेला मारवाडी स्थानिक लोक मराठीच बोलत असल्याने हळू हळू मराठी शिकत स्थानिक लोकांशी व्यवहार करत असे. आता देशाच्या कोणत्याही भागातून आलेला माणूस प्रथम हिंदी अथवा इंग्रजी मध्ये बोलतो. कारण मराठी माणूस मराठी विसरून सहज हिंदी नाहीतर तोडके मोडके इंग्रजी बोलतो.
महाराष्ट्रात मराठी भाषाचं असावी कारण वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी येणारे फोन हिंदीतून येतात, राज्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक रेल्वे सैन्यदल केंद्रीय आस्थापना यात परप्रांतातून आलेले कर्मचारी हिंदी इंग्रजी भाषेत बोलतात अल्पसंख्याक म्हणून मान्यता असलेल्या शिक्षण संस्थात सर्रास हिंदी व इंग्रजी भाषा वापरली जाते. देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्व आर्थिक नाडया परप्रांतीय यांच्या ताब्यात गेल्या आहेत,रोजगारासाठी आलेल्या लोंढ्यानी झोपडपट्टया फुटपाथ व्यापले शिवाय झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मिळालेल्या सदनिकेत परप्रांतीय प्रमाण जास्त ते हिंदी बोलतात,मेट्रो शहरात RTO च्या कृपेने रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर मध्ये परप्रांतीय प्रमाण जास्त ते हिंदी बोलतात.
सर्व महापालिकेच्या कृपेने बिनभाड्याच्या रस्त्यावर पथाऱ्या झोपड्या यात परप्रांतीय प्रमाण जास्त ते हिंदी बोलतात राज्यात IT क्षेत्रात आलेले लोक परप्रांतीय प्रमाण जास्त ते इंग्रजी बोलतात. राज्यातील हॉटेल व्यवसायात मालक व व्यवस्थापक म्हणून आणि वेटर म्हणून यात परप्रांतीय प्रमाण जास्त ते हिंदी बोलतात आपणही हिंदीत ऑर्डर देतो. बिल्डर सेवा क्षेत्र व्यावसायिक आस्थापना यांच्यातून मराठी हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कायद्यातील तरतुदी चा भंग करून सर्रास शेतजमिनी घेत सुटलेला परप्रांतीय आणि त्यांचे महसुली अधिकारी साथीदार,ऑनलाईन भिशी योजना दामदुप्पट इ फसवणूक योजनेत तसेच वित्तीय कंपन्या यात परप्रांतीय प्रमाण जास्त ते हिंदी बोलतात.
गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडी पाहता तेथेही परप्रांतीय प्रमाण जास्त,उच्चभ्रू मराठी कुटुंबात, अलीकडे टॉवर संस्कृतीत मराठी माणसे पण इंग्लिश मध्ये बोलतात. गेल्या ७ दशकात मराठी महाराष्ट्राने संयुक्त महाराष्ट्राचा लढा विसरून आपल्या मातृभाषे पेक्षा हिंदीला स्वीकारले आहे. आमची मुले हिंदी चित्रपट हिंदी मालिका बघता बघता हिंदी आत्मसात करतात. याशिवाय 5 वी नंतर अभ्यासक्रमात हिंदी भाषा आहेचं आम्ही हिंदीचा भाषेचा द्वेष करत नाही ५ वी च्या पुढे हिंदी भाषा अभ्यासक्रमात आहेच मग त्या आधी १ ली पासून हिंदीचा एवढा आग्रह का ?
राज्यातील गणपती मंडळे, वारकरी संप्रदाय, उत्सव समित्या,गृहनिर्माण संस्था,सहकारी सार्वजनिक संस्था संघटना यांनी आपले ठराव करा पत्र द्या लोकप्रतिनिधी यांना संपर्क करा भूमिका मांडा. तसेच रक्त सांडून मिळवलेला शिवरायांचा,ज्ञानोबा, तुकारामांचा हा महाराष्ट्र आणि त्यावर मराठी भाषेवरचे अनावश्यक हिंदी आक्रमण हे थोपवले पाहिजे. असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा