श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)
मेढा (जावली) : जुन्या आठवणीत आयोजित केलेल्या 1994 - 95 च्या दहावी बॅच मधून विविध क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सज्ज होत, यशस्वीपणे वाटचाल करणारे जुने सवंगडी 30 वर्षांनी पुन्हा एकत्र आले. मेढा येथे श्री वेण्णा हायस्कूल 80 माजी विद्यार्थ्यांच्या किलबिलिटाने पुन्हा गजबजून गेले.
बालपणीचा काळ सुखाचा' या आठवणीत सर्व वर्गमित्र गप्पा , गोष्टींमध्ये हरवून गेले. ज्या शाळेमध्ये शिकलो , लहानाचे मोठे झालो व गुरुजनांच्या शिकवण्यातून धडा घेत , आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहोत , असे असताना पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी , जुन्या आठवणींना उजाळा द्यावा , गुरुजनांना भेटावे , सोबत शिकत असलेल्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारून त्यांची सुख दुःख जाणून घ्यावीत. या उद्देशाने 1994-95 या वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यात शाळेचे तत्कालीन शिक्षक श्री पिसाळ सर , श्री व सौ ढापरे , श्री धुमाळ सर व श्री ए पी कांबळे सर व विद्यमान मुख्याध्यापक श्री पाटील सर यांचा कृतज्ञ पूर्वक सत्कार करण्यात आला. शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जि. प. प्राथमीक शाळा मेढा व श्री वेण्णा हायस्कूल शाळेला वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली.
तसेच या बॅचमधील शहीद रवींद्र धनावडे यांच्या मोहाट येथील स्मृतीस्थळास सर्व सवंगड्यांनी भेट देऊन त्याच्या आठवणींना उजाळा दिला. शहीद रवींद्र धनवडेंबद्दल राजश्री शिंदे , ललिता शिंदे , वनिता मर्ढेकर , चंद्रकांत साळुंखे यांनी गौरवउद्गार काढले. या मेळाव्यात तत्कालीन शिक्षक व माजी विद्यार्थी सुनील जवळ, महादेव मर्ढेकर , भारती मोरे , माधुरी जवळ , वैशाली कांबळे , विनायक खाटमोडे , प्रदीप लोहार , राम जवळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
हा स्नेहमेळावा जिल्हा परिषद आदर्श शाळा मेढा , श्री वेण्णा हायस्कूल मेढा व राधेय कृषी पर्यटन वाटंबे येथे आयोजित करण्यासाठी रेश्मा वेंदे , सुजाता सुर्वे , सुनंदा बनसोड , विजया जवळ , मंदा कांबळे , दीपा धनावडे , शितल डिगे , सुधाकर दुंदळे, अमोल वेंदे , गोपीचंद धनावडे , सागर इगावे , शिवा सपकाळ , सुनील धनावडे , विनोद कुंभार , संतोष जाधव , प्रदीप धनावडे , संतोष धनावडे , प्रदीप वाघ यांनी विशेष प्रयत्न केले.
या मेळाव्यात सर्व बालसंवगड्यांनी गाणी , विविध खेळ , गप्पागोष्टी मधून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. श्री बाबुराव पवार व विनोद डिगे यांनी चहापाण्याची सोय केली. जगन्नाथ सुतार , अशोक महाडिक , राम चिकणे , विनायक भोसले , अंकुश गायकवाड , सुशील चिकणे , अजित पवार यांनी विविध खेळ , विनोद करुन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार जावली शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री सुधाकर दुंदळे गुरुजी यांनी केले.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)

टिप्पणी पोस्ट करा