युवासेना जिल्हा प्रमुखपदी मिलिंद तोडकर यांची नियुक्ती

श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड


कराड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना जिल्हा प्रमुखपदी ओगलेवाडी (ता.कराड) येथील शिवसैनिक मिलिंद तोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हि नुयक्ती केल्याचे शिवेसना-युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांनी जाहिर केले आहे. 

मिलिंद तोडकर यांच्यावर कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवसैनिक व युवासेनेचे कराड उत्तर उप तालुका प्रमुख म्हणून मिलिंद तोडकर यांनी केलेल्या सामाजीक कामाची दखल घेऊन त्यांना जिल्हा प्रमुख पदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे. 

यापुढेही जिल्हाप्रमुख पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्या बरोबरच दोन्ही तालुक्यात पक्ष वाढवण्यासाठी ताकतीनीशी प्रयत्न करणार असल्याचे मिलिंद तोडकर यांनी सांगितले.



न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने