बुध्दगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या खटाव तालुक्यातून आंबेडकर चळवळीतील कार्यकर्तेची मागणी

श्री.लालासाहेब माने पाटील 
प्रतिनिधी / वडूज (सातारा)


खटाव (सातारा) : बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दाच्या ताब्यात मिळावे व बोधगया टेंपल एकट १९४९ तात्काळ रद्द करावा या मागणी साठी भारतीय भिक्कु संघाचे गेली पन्नास दिवस आंदोलन चालु आहे या आंदोलनाला जगभरातुन पाठींबा मिळत आहे , परंतु अजुनही केंद्र सरकार आणि बिहार सरकार या मागणीला दाद देताना दिसुन येत नाही. याच पाश्र्वभुमीवर भारतभर तमाम बौद्ध बांधव आंदोलन करत आहे. त्यामुळे बौद्ध समाजमध्ये तीव्र नाराजी निमार्ण झालेली आहे. आणि आता सर्व देशभरातुन या बौद्धगया मुक्ती आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व सर्वच राजकीय पक्षातील बौद्ध बांधवानी ठीकठीकाणी विविध स्वरूपाची आंदोलने करत आहे. तसेच सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न चालु झालेला आहे.


यामुळे समाजातील खटाव तालुका भारतीय बौध्द महासभा व सर्वपक्षीय बौध्द बांधवानी मोठया संखेने भव्य मोर्चा काढून तहासिलदार कार्यालय वडूज ( खटाव ) येथे धरणे आंदोलन करुन रास्ट्रपतींच्या नावे आपले निवेदन सादर केले. या निवेदनात आमची मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात यावी अन्यथा संपुर्ण समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे.


या आंदोलनात सर्वच आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यामध्ये मा. गणेश भोसले, शिवाजी सर्वागोड, अमरजित कांबळे,बाळासाहेब झेंडे, अजित नलवडे, सत्यवान कमाने, संदिप खरात, भगवान मोरे, सुनिल कदम, मिलिंद रणदिवे, सुनील मिसाळ ,प्रशांत सर्वगोड, कुनाल गडांकुश, बबन जगताप,विठ्ठल नलावडे, अर्जुन भालेराव, नितीन भोसले, दत्ता केंगारे , गौतमी मसने, अनिता तोरणे, बापूराव वाघमारे गणेश यादव, संदेश वाघमारे मा.कार्यकर्ते भिमसैनिक महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / वडूज (सातारा)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने