श्री.गणेश मंडपे
प्रतिनिधी / जालना
जालना : महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मौजे पारडगांव ता.घनसावंगी जि.जालना येथे महिला शिक्षणाचे क्रांती निर्माता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमीचे पुजन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शिक्षक वर्ग श्री अर्जुन खरात सर, राजूशिंग तौर सर, बळीराम बांगल सर, नामदेव अवाड सर, प्रभाकर लहाने सर, तसेच इतर शाळेचे शिक्षक सागुले सर, भाडंवलकर सर, काकडे सर, तसेच शालेय शिक्षण समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर प्रभाकर डोळझाके , प्रमेश्वर ढेरे पाटील, पांडुरंग ठोंबरे पाटील, रामेश्वर ढेरे पाटील, अशोक वाघमारे, विष्णू अढाव, तसेच अशोकराव राऊत हे उपस्थित होते.
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे झाला आणि या वर्षी त्यांची 197 वी जयंती आहे. ते एक समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते ज्यांनी आपले जीवन शोषितांच्या शिक्षणासाठी आणि उत्थानासाठी तसेच अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी समर्पित केले.
1848 मध्ये ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी एक शाळा उघडली, जी भारतातील महिला शिक्षणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल होते. त्यावेळी पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी एक महत्त्वपूर्ण मोहीम देखील सुरू केली होती. यासह त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले. त्यांचे जीवन हे आदर्शवत जीवन होते. त्यांना जयंतीनिमित्त शत शत नमन..!
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / जालना




टिप्पणी पोस्ट करा