14 वर्षानंतर मिळाला न्याय, हाकेच्या अंतरावर शेतामध्ये जाण्यासाठी पाच कि.मी. लांबून मिळाला शेत रस्ता


देगाव (वाई) : शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा आणि गरजेचा विषय म्हणजे शेत रस्ता, आणि या शेतीमध्ये जाण्यास रस्ता उपलब्ध नसल्यामुळेच अनेक शेतकऱ्यांना अडचणी येतात, शेती' म्हंटलं की त्यात भावकी किंवा शेजाऱ्याशी भांडण आलंच. या भांडणामुळे अनेक लोकांना शेतीच करता येत नाही त्याच कारण म्हणजे शेतात जाण्यासाठी रस्ता नसणे. मग आपल्याला हक्काचा रस्ता कधी मिळणार ? या विचारात शेतकरी गुरफटून जातो. 

आपल्या माहीत आहे की, जसे शेतकऱ्याला शेतामध्ये उत्पादन महत्वाचे आहे अगदी त्याप्रमाणेच शेत रस्ता देखील त्याच्यासाठी तितकाच महत्वाचा असतो, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील देगाव गावचे शेतकरी माजी सैनिक, श्री यशवंत भिकु इथापे यांना मिळाला 14 वर्षानंतर न्याय, परंतु हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शेतामध्ये जाण्यासाठी पाच किलोमीटर लांबून मिळाला शेत रस्ता, शेतकरी यशवंत भिकु इथापे यांचा दावा अर्ज प्रशासनाकडून अशतः मंजूर करण्यात आला आहे.

मौजे देगाव तालुका वाई जिल्हा सातारा येथील गट नंबर 342 मधील ओढयाच्या उत्तरेकडील असलेल्या अंदाजे 8 गुंठे क्षेत्रास या मिळकतीमध्ये जाणे-येणेसाठी सामनेवाला यांचे गट नंबर 460,461,462,459 व 443 च्या भूमापन क्रमांकाच्या सिमेवरून प्रत्येकी 5 फूट उत्तर-दक्षिण असा 10 फुट रुंदीचा रस्ता बैलगाडी व शेतीपिकाची ने-आण करणेसाठी वापरली जाणारी प्रचलित वाहने ये-जा करतील एवढ्या रुंदीचा रस्ता वाद मिळकती पर्यंत पोहचे पर्यंत मंजूर करणेत आला आहे.

असे असले तरी शेतकरी माजी सैनिक यशवंत भिकू इतापे यांच्या राहत्या घरापासून जवळच म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या त्यांच्या गट नंबर 342 मधील शेतात जाण्याकरता पाच किलोमीटर लांब अंतरावरून प्रशासनाच्या वतीने रस्ता उपलब्ध करून देण्यात आल्याने माजी सैनिक यशवंत भिकू इतापे यांना खरंच न्याय मिळाला का असा प्रश्नही स्थानिकांच्या मनात निर्माण होत आहे. 

शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्यासाठी शेत रस्त्यांची गरज आहे, परंतु काही लोकांच्या आडमुठे पणामुळे असे प्रकार महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाहावयास मिळत आहेत, सरकारने शेत रस्त्यांबाबत ठोस निर्णय कमित कमी कालावधीत घेऊन शेतकऱ्यांना शेत रस्त्यांच्या बाबत येणाऱ्या अडचणीतून त्रास मुक्त करावे अशी शेतकरी वर्गाकडून प्रशासनाकडे मागणी होत आहे.


न्युज मराठी लाईव्ह 
वाई (सातारा)



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने