श्री.लालसिंग शिंदे
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)
कुडाळ (सोनगाव) : जावली तालुक्यातील सांप्रदायकाची परंपरा असलेल्या सोनगाव या ठिकाणी दरवर्षी ज्ञानेश्वर पारायण सोहळा आयोजित केला जातो. यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर सामुदायिक पारायण सोहळा गुरुवार दिनांक २० मार्च ते गुरुवार दिनांक २७ मार्च या कालावधीमध्ये श्री विठ्ठल मंदिर, सोनगाव ता. जावळी जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष मयूर देशमुख यांनी दिली आहे.
गुरूवारी सकाळी आठ वाजता कलश व वीणा पूजन होईल आणि ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास प्रारंभ होईल. पारायण सप्ताह कालावधीत पहाटे पाच ते सात या वेळेत काकडा आरती, सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी दोन ते पाच या वेळेत ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन, सायंकाळी पाच ते साडेपाच या वेळेत प्रवचन, साडेपाच ते साडेसहा या वेळेत हरिपाठ, सायंकाळी सात ते नऊ या वेळेत किर्तन आणि रात्री नऊ नंतर जागर, असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे .
ह.भ.प. अंगद महाराज चव्हाण व्यासपीठ चालक आहेत. गुरूवारी (ता. २०) सायंकाळी ह.भ.प. शिवलिलाताई पाटील यांचे किर्तन होणार आहे. शुक्रवारी ह.भ.प. संजय महाराज वेळूकर, शनिवारी ह.भ.प. माऊली महाराज पठाडे, रविवारी ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर, सोमवारी ह.भ.प. विशाल महाराज खोले, मंगळवारी ह.भ.प. महंत प्रमोद महाराज जगताप, बुधवारी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांचे किर्तन होणार आहे.
गुरूवारी (ता. २७) सकाळी आठ ते नऊ या वेळेत ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन सांगता, नऊ ते अकरा या वेळेत ह.भ.प .उमेश महाराज किर्दत यांचे किर्तन होणार आहे. सायंकाळी चार वाजता दिंडी सोहळा होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री व जावळीचे सुपुत्र नामदार एकनाथ शिंदे, खासदार श्रीमंत छत्रपती शिंदे उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, दीपक पवार, ऋषिभाई शिंदे, सौरभ शिंदे, अमित कदम, अशोक माटेकर, श्रीकांत पाखरे उपस्थित राहणार आहेत.
पारायण सप्ताह कालावधीतील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पारायण समितीचे अध्यक्ष मयूर रामदास देशमुख व खजिनदार गणपत बाळू शिंदे यांच्या सह सोनगाव ग्रामस्थांनी तसेच वारकरी संप्रदायाच्या सर्व मान्यवरांनी केले आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)


टिप्पणी पोस्ट करा