बारामती येथे होणाऱ्या टिपू सुलतान मिरवणुकीची परवानगी रद्द व्हावी सकल हिंदू समाजाच्या वतीने कराड ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन

प्रतिनिधी : श्री.अनिल मोरे 


कराड (सातारा) : एमआयएम पक्षाच्या वतीने सोळा डिसेंबर रोजी फैयाज इलाही शेख यांना टिपू सुलतान मिरवणुकीला बारामती पोलीस स्टेशनने जी परवानगी दिली होती. ती तात्काळ रद्द व्हावी म्हणून कराड सकल हिंदू समाजाच्या वतीने कराड ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.
     या निवेदनामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने असे म्हटले आहे की आम्ही या देशाचे सुजाण नागरिक असून या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सर्वांनी याची काळजी घ्यावयाची आहे.कारण आपण सर्व देशवासी गाव शहरात शांततेने नांदत आहोत. आणि गाव वस्ती शहरांमध्ये शांतता नांदो म्हणून सकल हिंदू समाज सतत प्रशासनाला सहकार्य करत आलेला आहे. 
    पण बारामती पोलीस स्टेशनचे पो नि यांनी एमआयएम पक्षाचे फैयाज इलाई शेख यांना सोळा डिसेंबर रोजी टिपू सुलतान मिरवणुकीला परवानगी दिल्याचे कळल्यानंतर सकल हिंदू समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने व सरकारने तात्काळ निर्णय घेणे महत्त्वाचा आहे.
    या ठिकाणी सकल हिंदू समाजच्या वतीने असेही म्हणण्यात आले आहे की भारताचे राष्ट्रपती अनुशास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे भारत देशासाठी फार मोठे योगदान आहे.त्यांच्या सन्मानार्थ मिरवणुकीला आमचा सदैव पाठिंबा राहील. कारण ते देश प्रेमी होते. त्यांनी भारत देशाचे संरक्षण कसे मजबूत होईल यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे.पण या जातीयवादी पक्षाचा इतिहास पाहिला तर धर्मद्वेषी प्रक्षोभक चीतावणी खोर भाषणे करणे. कट्टर धर्मद्वेशाचे बीज पेरणे धर्मातील तरुण युवकांची माथी भडकवणे हा त्यांचा महत्त्वाचा अजेंडा राहिलेला आहे. 
    त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी टिपू सुलतान मिरवणूक परवानगी तात्काळ रद्द व्हावी असे सकल हिंदू समाजाच्या वतीने कराड ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.




न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने