हिंगोली जिल्ह्यातील गुगुळ पिंपरी येथील शेतकऱ्यावर कोल्ह्याचा जीव घेणा हल्ला

प्रतिनिधी : श्री.निलेश सुर्वे   

हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथील शेतकरी गजानन कांता बेद्रे हे शेतात गेले असता कोल्ह्याने त्त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. शेतकऱ्याने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावून आले व जखमी शेतकऱ्याला तात्काळ वाशीम येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोल्ह्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याने सर्जरी करून पुढील उपचार सुरू आहेत. 


आतापर्यंत त्यानां उपचाराकरिता 50 हजार खर्च आला आहे. शेतकरी गजानन कांता बेद्रे यांची परिस्थिती हलाखीची असून वनविभागाच्या मदतीच्या ते प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्याचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार असून वनविभागाचे या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य होत असल्याचे येथील शेतकरी सांगतात. वन्य प्राण्यासाठी जिल्ह्यामध्ये खूप वेळा आंदोलन उपोषण करून सुद्धा वन विभाग याकडे लक्ष देत नाही. जखमी शेतकऱ्याला तात्काळ मदत देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / हिंगोली 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने