स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धा अंतर्गत प्रश्नमंजूषा स्पर्धेत लहान गटात जावली तालुक्यातील आलेवाडी शाळा तालुक्यात प्रथम

प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य (काका) 


आलेवाडी (कुडाळ) : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धा अंतर्गत जावली तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा येथे पार पडल्या. यामध्ये लहान गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेवाडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भणंग शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला तर महू शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.
       जावली तालुक्यातील गुणवत्तापूर्ण अशी आलेवाडी शाळेची ओळख असून येथील शिक्षकांचे यासाठी मोलाचे योगदान आहे.विविध स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. तालुकास्तरीय प्रशमंजुषा स्पर्धेत तिसरी ते पाचवीमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.गुणवत्ता दर्शविणा-या प्रश्नमंजुषा स्पर्धेत आलेवाडी शाळेने प्रथम क्रमांक पटकावत शाळेची मान अभिमानाने उंचावली आहे. या स्पर्धेमध्ये विघ्नेश तानाजी पवार, विघ्नेश संतोष नेवेकर व शुभ्रा विठ्ठल शिर्के या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
      यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका प्रियांका किरवे, आप्पासाहेब निकम, जोती राऊत, कार्यकुशल व प्रेरक मुख्याध्यापक नितीन जाधव यांनी मार्गदर्शन केले.शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ ,शिक्षणविस्तार अधिकारी अरविंद दळवी , चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख वंदना गंगावणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी पवार व सर्व सदस्य ग्रामस्थ मंडळ आलेवाडी यांनी अभिनंदन केले.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने