भुईंज (वाई) : दिनांक 13/12/2024 भुईंज पोलीस ठाणे वाहतूक विभाग व प्रवाह सामाजिक संस्था वाई यांचे वतीने किसनवीर सहकारी साखर कारखाना ऊस तोडी कामगारांच्या वाहनांना रिफ्लेक्टर स्टीकर लावून वाहतुकीचे नियम व घ्यावयाची काळजी यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
महामार्ग पोलीस मदत केंद्र भुईंज चे प्रभारी अधिकारी श्री.वंजारे सहा.पोलीस उपनिरीक्षक, पो.उप.निरीक्षक श्री.सतीश सुभे,पोलीस हवालदार प्रशांत शिंदे,प्रवाह संस्था सदस्य प्रमोद भिसे,अक्षय कांबळे , संग्राम खरात , उमेश वाघमारे (जांब), सुरेश पुजारी, प्रथमेश कांबळे, तेजस कांबळे, प्रबुद्ध खंडागळे, गणेश मांढरे, कारखान्याचे अधिकारी श्री.अजित पिसाळ, शेती विभाग आधिकारी, मुकादम अजित पिसाळ, विश्वास मालुसरे, शेतकरी कृष्णात पिसाळ, संभाजी पिसाळ, मुकुंद पिसाळ क्रांती बांधकाम कामगार संघटना सातारा, निलेश माने जिल्हाध्यक्ष, हनुमंत पिसाळ तसेच प्रवाह सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / भुईंज (वाई)



