प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे
कुसुंबी (जावली) : नाचणीचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुसुंबी जांभळवाडी गावामध्ये काल नाताळच्या सुट्टी निमित्त समस्त ग्रामस्थांनी श्रमदानातून केले गाव स्वच्छ या स्वच्छतेतून समस्त ग्रामस्थांनी दिला स्वच्छतेचा संदेश या धावपळीच्या युगातही आपल्या गावासाठी आपण काहीतरी करावं थोडा फार तरी वेळ द्यावा अशी संकल्पना मनामध्ये ठेवून नाताळच्या सुट्टीचा दिवस एका चांगल्या कामासाठी सत्कारनी लागावा असे ध्येय मनामध्ये बाळगून समस्त ग्रामस्थांनी महिला वर्ग, तरुण वर्ग,माता भगिनी यांनी घराबाहेर पडून संपूर्ण गाव स्वच्छ केला.
यामध्ये रस्त्याला च्या आजूबाजूला असणारी झाडी झुडपे तोडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी काटेरी झाडे तोडून काढली ग्रामस्थांच्या या तालुक्यातील लोकांना एक चांगला संदेश आणि एकीचे बळ दाखवून दिले यामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला असणारे गवत काटेरी झाडे झुडपे तसेच रस्त्यात अडथळा निर्माण करणारे दगड ,कचरा काढून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा वसा घेत सर्व परिसर स्वच्छ केला. नाताळची सुट्टी वाया न घालवता एका चांगल्या कामासाठी वेळ उपयोगी पडला आम्ही दरवर्षी नाताळच्या सुट्टी दिवशी श्रमदान करतो असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले या उपक्रमासाठी समस्त जावली तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुसुंबी (जावली)

