प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य (काका)
आलेवाडी (जावली) : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आलेवाडी शाळेने अनेक स्पर्धांत अभूतपूर्व यश मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आपल्या शाळेने हस्तलिखित स्पर्धा निमित्ताने दुस-यांदा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत इतिहास रचला आहे. एकजूटीने झालेले शिक्षक मार्गदर्शन व कार्याला समर्पित विद्यार्थी यांनी यंदा सं|त|म|हि|मा या शीर्षकाचे हस्तलिखित निर्माण करुन तालुकास्तरीय स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत आलेवाडीची शान वाढवली.
मुख्याध्यापक नितीन जाधव, आप्पासाहेब निकम, प्रियांका किरवे, ज्योती राऊत यांचे अनमोल मार्गदर्शन व प्रेरणा मुलांना लाभली.
हस्तलिखित यशाचे सर्वञ कौतुक होत असून मान. गट शि. अधिकारी संजय धुमाळ, भाग वि. अधिकारी मान. अरविंद दळवी, केंद्रप्रमुख मान. सौ. वंदना गंगावणे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
शा. व्य. स. अध्यक्ष श्री. तानाजी पवार व उपाध्यक्षा सौ. प्रियांका शेलार,मंदा पवार, नवनाथ बिरामणे,संदीप बांदल, विश्वनाथ वारागडे,तुषार बांदल, शैला पवार, सविता पवार,अर्चना कांबळे, सुनिता पवार यांनीही अभिनंदन केले.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)

