हिंगोली पोलीस कर्मचारी गोळीबार प्रकरणातील मृताची संख्या तीन वर

प्रतिनिधी : निलेश सुर्वे

हिंगोली : हिंगोलीच्या वाई गावातील वातावरण सुन्न हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात आता पर्यंत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. हिंगोली शहरात काही दिवसापूर्वी पोलीस कर्मचारी विकास मुकाडे याने 25 डिसेंबर ला हिंगोली शहरात सासर वाडीत येऊन, बायको, मुलगा, सासू व मेव्हणा यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत पत्नी मयूरी हिचा जागेवरच मृत्यू झाला होता व जखमी सासू, मेव्हणा, व अडीच वर्ष्याचा मुलगा गंभीर जखमी झाले होते, त्यानां उपचारासाठी नांदेड ला हलवण्यात आले होते. उपचारा दरम्यान नांदेड येथे मेव्हण्याचा 29 तारखेला मृत्यू झाला.काल30 डिसेंबर ला सासूचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आता पर्यंत झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांच्या वाई गाव या घटनेने सुन्न झाले आहे.वसमत शहर पोलीस स्टेटशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी विकास मुकाडे यांनी 25 डिसेंबर ला रात्रीच्या सुमारास हिंगोलीतील प्रगतीनगर भागामध्ये सासर वाडीत जाऊन गोळीबार केला होता यामध्ये त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. व सासू, मेव्हणा, आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान नांदेड येथे सासू व मेव्हण्याचा मृत्यू झाला. व मुलावर उपचार सुरु आहेत. सदरील प्रकरणात आरोपी मुकाडे व सासरच्या मंडळीकडून त्याची पत्नी मयुरी हिचा सतत छळ केला जात असल्याने या प्रकरणात सासरच्यावरही गुन्हे दाखल करावे या मागणी साठी त्याचे नातेवाईक हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आले होते.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / हिंगोली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने