प्रतिनिधी : निलेश सुर्वे
हिंगोली : 28 डिसेंबर 2024 सहयाद्री अतिथी गृहात आयोजित एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या पार पडलेल्या बैठकीत मा.राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर ह्यांनी मा. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस हयांच्या प्रमुख उपस्थितीत होल्डिंग कंपनीच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. उपाध्यक्ष तथा ऊर्जा राज्यमंत्री या नात्याने मा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करणे, हरित ऊर्जेच्या वापरावर जास्त भर देणे मराठवाड्यासह राज्यातील सर्व वीज समस्याचे निराकरण करण्यासाठी माझी आग्रही भूमिका राहील असे मेघनाताई यांनी सांगितले.या बैठकीला प्रधानसचिव (ऊर्जा ), महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / हिंगोली
