प्रतिनिधी : श्री.राहुल पवार
गोवा (पणजी) : गोवा मुक्ती दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला सामाजिक क्षेत्राची आवड आपण समाजाचं काहीतरी देणे आहे या भावनेने समाजासाठी धडपडणाऱ्या गोव्यातील प्राध्यापक कुमारी समीक्षा नागेश शिरोडकर यांना सामाजिक पुरस्कार देण्यात आला समाज कल्याण खात्याकडून हा पुरस्कार देण्यात येतो समीक्षा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यांनी शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत विविध क्षेत्रात त काम करत आहे मुलांसाठी उत्कृष्ट व्यासपीठ मिळवण्यासाठी त्यांनी विविध संस्थेतील सामाजिक ओळख निर्माण केली आहे.
गोवा महाराष्ट्र या राज्यात सुद्धा त्या सामाजिक काम करतात विशेष म्हणजे महाराष्ट्र गोव्यात युवकांसाठी विविध व्यासपीठ उपलब्ध करतात मध्यंतरी महाराष्ट्रात कोविड-19 काळात मुलांची मानसिकता यासाठी उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. मुलांमध्ये सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांच्या मानसिकते वरती गंभीर परिणाम होत आहे यासाठी प्रबोधन व विद्यापीठ मध्ये कॉन्सलर सेंटर निर्माण व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अखंड लढा त्या देत आहेत : कु.समिक्षा शेट शिरोडकर हिने गोवा विद्यापीठातून एम. ए ( कोंकणी) शिवाजी विद्यापीठातून एम. ए (मराठी) व मुंबय विद्यापीठातून बी. एड. पर्यत शिक्षण झाले असून त्या कुर्टी फोंडा येथील कामाक्षी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात कोंकणी विषय तर विजयानंद ज्ञानप्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी हा विषय शिकवितात. त्यांचे तरूण भारत, गोम्नतक, दैनिक हेराल्ड, गोवन वार्ता, पुढारी, लोकमत, भांगरभुंय अशा वर्तमानपत्रातून लेख प्रसिध्द झाले आहेत. साहित्य मंथन सत्तरी, कोंकणी सेवा केंद्र साखळी, डिचोली कोंकणी सेवा केंद्र, सम्राट क्लब मये अश्या विविध संस्थामध्ये त्या सदस्य आहेत. विविध कोंकणी कार्यशाळांनी त्या सहभागी झाल्या आहेत. राज्य स्तरावरील स्पर्धामधून त्यांनी पारितोषिके प्राप्त केली आहे. शिक्षक मर्यादीत राज्यपातळीवर निबंध स्पर्धेला त्यांना दुसरे बक्षिस प्राप्त झाले आहे. युवा क्लब पणजीने आयेजित केलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम पारितेषिक प्राप्त केले आहे. अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तसेच स्पर्धाचे परीक्षण केले आहे.
2014-2015 या शैक्षणिक वर्षाची कोंकणी अकादमीची शैक्षणिक शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झाली आहे. पदव्युत्तर स्तरावर लेखक अशोक कामत यांच्या घणाघाय नियतीचे कादंबरीतील समाज चित्रण या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. तसेच अंतरंग हे त्यांचे निबंध संग्रहाचे पुस्तक प्रकाशीत झाले आहे. राष्ट्रीय संमेलनाला त्या हुबळी येथे सहभागी झाल्या आहेत. तसेच नाशिक येथे राष्ट्रीय संमेलनाला Nodal Officer म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. आता त्यांना राज्य पातळीवर समाज कल्याण खात्याचा सामाजीक पुरस्कार मिळाला म्हणून सर्वांनी त्याच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 2018 पा सून सामाजीक कार्यांचे काम करत आहेत. सद्दृया सम्राट क्लब मयेच्या खजिनदार म्हणून काम करतात त्यांना सामाजिक पुरस्कार मिळाल्यानंतर विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / गोवा (पणजी)
