काटवली - ठाणे बस डिव्हिजन ऑफिस ची परमिशन मिळत नसल्या कारणाने पुढील निर्णय कळेपर्यंत मेढा आगार यांनी घेतला बंद ठेवण्याचा निर्णय

प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य (काका)


काटवली (कुडाळ) : काटवली - ठाणे बस डिव्हिजन ऑफिस ची परमिशन मिळत नसल्या कारणाने पुढील निर्णय कळेपर्यंत मेढा आगार यांनी जरी घेतला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी या विभागातील प्रवाशांची अडचण लक्षात घेता छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा जावली चे आमदार यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेण्यासाठी आदेश जारी केला आहे. 


काटवली - ठाणे बसच्या सर्व प्रवासी वर्गाने याची नोंद घ्यावी. असे मेढा आगार यांच्यावतीने प्रवासी वर्गाला आवाहन करण्यात आले आहे. तसेच मेढा आगार यांच्या वतीने काटवली - ठाणे बस बंद झाल्याबद्दल मेढा आगाराच्या वतीने दिलगिरी सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. ऐन यात्रेच्या हंगामात डिव्हिजन ने असा निर्णय देणे योग्य नाही. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी बस पूर्ववत चालू करण्यासाठी परिसरातील सर्व प्रवाशांनी एकत्रिपणे उभे राहण्याची गरज आहे. सगळे सोबत राहिल्यास एकत्र येऊन बस पूर्वरत करण्यात येऊ शकते असे आवाहन मेढा आगार यांच्या वतीने नागरिकांसाठी करण्यात आले आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने