बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील)
लोणंद : मुस्लिम कब्रस्थानभूमी विकासासाठी आमदार फंडातून रूपये ५० लक्ष निधी वाटप आणि अधिकचे ३० लक्ष निधीची तरतूद केल्याबद्दल लोणंद मुस्लिम जमाअत तर्फे वाई-खंडाळा-महाबळेश्वर आमदार मकरंद पाटील यांचा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष राजू भाई कुरेशी,उपाध्यक्ष महंमदशेठ कच्छी,विश्वस्थ सत्तार भाई काझी,जब्बारभाई पटेल यांच्या शुभहस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.यावेळी राजूभाई इनामदार,अॕड.बबलूभाई मणेर,ज्येष्ठ नेते बबलू भाई इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक करताना प्रा.अमीर इनामदार म्हणाले, "वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी आ.पाटील यांची भूमिका वाखणण्याजोगी आहे,मतदारसंघाचा विकास करताना शेवटच्या माणसाचा विकास व्हावा या उद्देशाने झटून कामे करणारे जनतेचे जननायक आमदार आहेत,आ. पाटील यांनी लोणंद शहरात स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास केंद्राची स्थापना करावी अशी विनंती केली"
अभ्यासक व परखड वक्ते राजू इनामदार म्हणाले-"वर्तमानकाळात सोशल मीडिया माध्यमातून माणसा-माणसामधील बुद्धिभेद वाढला असून सामाजिक सलोख्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण सामाजिक स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत" सुपरिचित विधिज्ञ अॕड.बबलू मणेर म्हणाले "समाज आणि लोकप्रतिनिधी यांची घट्ट वीण बांधली असून मुस्लिम समाज विकासासाठी आपण उपलब्ध केलेला ८० लक्ष निधी ही मोठी रक्कम असून खेड,ता. खंडाळा मधील मुस्लिम समाज विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली"
मुस्लिम समाजवतीने केलेल्या सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आ.पाटील म्हणाले-"आगामी काळातील विधानसभा निवडणुका महत्वाच्या असून लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका स्पष्ट करणे माझे आद्यकर्तव्य आहे, भारत देश अनेक जाती-धर्म मिळून एकोपा राखणारा देश आहे.सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी अविवेकी लोक प्रयत्न करत असले तरीसुद्धा प्रतिगामी वृत्तीना पुरोगामी विचार संपवू शकतो,रयतेचे राजे छत्रपती शिवराय,फुले दाम्पत्य,शाहू,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पुरोगामी विचारांचा वारसा पुढे अविरत पणे चालविणारे देशाचे नेते शरद पवार यांच्यावर माझी नितांत श्रद्धा व आदर आहे आणि पुढेही राहील यासोबत लोणंद विकासासाठी आमदार फंडातून १०० कोटी चा निधी उपलब्ध केला असून २४×७ पाणीपुरवठा योजना सुरू होईल,आरोग्य रक्षणासाठी भूमिगत गटारीसाठी भरघोस निधी दिला.मला तीन टर्म आमदार करण्यासाठी मुस्लिम समाजाचे विशेष योगदान आहे याबद्दल मी ऋणी आहे."
आभार जावेद पटेल यांनी मानले,हा समारंभ यशस्वी होण्यासाठी
माजी उपसरपंच नगरसेवक गणीभाई कच्छी,युवा नेते असगर शब्बीर इनामदार,पत्रकार राहिद सय्यद, इर्शाद पटेल, पापा पिंजारी यांनी अविरत परिश्रम घेतले. मुस्लिम कब्रस्थानभूमी विकासासाठी आमदार फंडातून रूपये ५० लक्ष निधी वाटप आणि अधिकचे ३० लक्ष निधीची तरतूद केल्याबद्दल लोणंद मुस्लिम जमाअत तर्फे वाई-खंडाळा-महाबळेश्वर आमदार मकरंद पाटील यांचा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष राजू भाई कुरेशी,उपाध्यक्ष महंमदशेठ कच्छी,विश्वस्थ सत्तार भाई काझी,जब्बारभाई पटेल यांच्या शुभहस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.यावेळी राजूभाई इनामदार,अॕड.बबलूभाई मणेर,ज्येष्ठ नेते बबलू भाई इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक करताना प्रा.अमीर इनामदार म्हणाले, "वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी आ.पाटील यांची भूमिका वाखणण्याजोगी आहे,मतदारसंघाचा विकास करताना शेवटच्या माणसाचा विकास व्हावा या उद्देशाने झटून कामे करणारे जनतेचे जननायक आमदार आहेत,आ. पाटील यांनी लोणंद शहरात स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास केंद्राची स्थापना करावी अशी विनंती केली"
अभ्यासक व परखड वक्ते राजू इनामदार म्हणाले-"वर्तमानकाळात सोशल मीडिया माध्यमातून माणसा-माणसामधील बुद्धिभेद वाढला असून सामाजिक सलोख्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण सामाजिक स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत" सुपरिचित विधिज्ञ अॕड.बबलू मणेर म्हणाले "समाज आणि लोकप्रतिनिधी यांची घट्ट वीण बांधली असून मुस्लिम समाज विकासासाठी आपण उपलब्ध केलेला ८० लक्ष निधी ही मोठी रक्कम असून खेड,ता. खंडाळा मधील मुस्लिम समाज विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली"
मुस्लिम समाजवतीने केलेल्या सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आ.पाटील म्हणाले-"आगामी काळातील विधानसभा निवडणुका महत्वाच्या असून लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका स्पष्ट करणे माझे आद्यकर्तव्य आहे, भारत देश अनेक जाती-धर्म मिळून एकोपा राखणारा देश आहे.सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी अविवेकी लोक प्रयत्न करत असले तरीसुद्धा प्रतिगामी वृत्तीना पुरोगामी विचार संपवू शकतो,रयतेचे राजे छत्रपती शिवराय,फुले दाम्पत्य,शाहू,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पुरोगामी विचारांचा वारसा पुढे अविरत पणे चालविणारे देशाचे नेते शरद पवार यांच्यावर माझी नितांत श्रद्धा व आदर आहे आणि पुढेही राहील यासोबत लोणंद विकासासाठी आमदार फंडातून १०० कोटी चा निधी उपलब्ध केला असून २४×७ पाणीपुरवठा योजना सुरू होईल,आरोग्य रक्षणासाठी भूमिगत गटारीसाठी भरघोस निधी दिला.मला तीन टर्म आमदार करण्यासाठी मुस्लिम समाजाचे विशेष योगदान आहे याबद्दल मी ऋणी आहे."
आभार जावेद पटेल यांनी मानले,हा समारंभ यशस्वी होण्यासाठी
माजी उपसरपंच नगरसेवक गणीभाई कच्छी,युवा नेते असगर शब्बीर इनामदार,पत्रकार राहिद सय्यद, इर्शाद पटेल, पापा पिंजारी यांनी अविरत परिश्रम घेतले.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / लोणंद
