प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य
कुडाळ (जावली) : विधानसभेची रणधुमाळी राज्यात सुरू झाली असून आचारसंहिता लागू होताच इच्छुक उमेदवार भेटीगाठी घेताना दिसत आहेत. त्यातच सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात पाच महाविकास आघाडीकडून जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे दिसून येत आहे. पाटण कोरेगाव कराड उत्तर वाई फलटण हे मतदारसंघ राष्ट्रवादी (शरदचंद्रजी पवार) पक्षाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कराड दक्षिण मधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे सातारा जावली मतदारसंघ शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वी अमित कदम यांनी (राष्ट्रवादी) शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली होती. पण जागावाटप नियोजनानुसार ही जागा शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाकडे जाऊ शकते. त्यामुळे जावलीतील उमेदवार इच्छुकांची धाखदुख वाढलेली दिसते. इच्छुक उमेदवार एस.एस.पारठे गुरुजी, दीपक बापू पवार, अमित कदम जावलीतून इच्छुक असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
काल महायुतीने आपले उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीची आज होणारी पत्रकार परिषद रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सातारा जावली मतदारसंघात तुतारी वाजवणारे उमेदवार हाती मशाल घेणार की आणखी कोणाला तिकीट मिळणार याकडे जावळीतील जनतेचे लक्ष लागले आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)
