प्रतिनिधी : श्री लालासाहेब माने (पाटील)
माण (खटाव) : जयकुमार गोरे (भाऊ) यांचा गाव भेट दौरा व कोपरा सभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या माण _खटाव विधानसभा मतदारसंघातील वडूज व औंध गटातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत औंध व वडूज ता. खटाव या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांनी गावभेट दौरा _कोपरा सभेत_ पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
येणाऱ्या 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहीवडी या ठिकाणी सर्वांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या भागात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणी प्रश्न आपण मार्गी लावले. अनेक जलसिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करून उरमोडी जिहे _कठापूर जलसिंचन योजना पूर्ण केल्या टेंभू योजनेचे भूमिपूजन करून काम सुरू केले जोड रस्ते, गावअंतर्गत रस्ते, सामाजिक भवन,सभामंडप, जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा योजने सारखी कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे आपण केली. तसेच लाडकी बहीण योजना, अशा विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला लाभ मिळवून दिला.
औंधसह 21 गावांचा पाणी प्रश्न आपण मार्गी लावला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राहिलेल्या 5 गावांचा समावेश योजनेमध्ये करून घेतला आहे औंध पाणी योजना नवीन असल्यामुळे येत्या काही दिवसात राज्यपालांची सही झाल्यानंतर मान्यता मिळेल त्यामुळे औंध पाणी योजनेचा कायमचा प्रश्न मिटणार आहे.
आपल्या मतदार संघातील पाण्याबाबतची ही शेवटची निवडणूक असेल येत्या काळात आता पाण्यासाठी कोणालाही संघर्ष करावा लागणार नाही.
सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा, माझ्या माय माऊलींचे भक्कम पाठबळ आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मला नक्कीच मिळतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर, विकल्प शहा, सोमनाथ भोसले, युवानेते विशाल बागल, भरतशेठ जाधव ,धनाजी आमले मेजर ,वसंत पवार मेजर, शिवाजीराव सर्वगोड, लांडेवाडीचे उपसरपंच हणमंत खंडागळे, मधुकर इंगळे बापू, शिरसवडी चे सरपंच संतोष कुदळे, ज्ञानेश्वर पवार, विठ्ठल चव्हाण, संतोष जाधव चेअरमन , प्रशांत कुंभार, संतोष भोसले ,सोमनाथ बुधे ,रवींद्र पवार, आलीम मोदी, अमोल साळुंखे,संदीप गुरव, अजित माळी,चंद्रकांत पवार, चेअरमन ,सागर गुरव ,विनोद चव्हाण ,पोपट पाटील ,विकास माने ,नामदेव माने ,संतोष पुराणिक ,काका घाडगे, बाबू मुल्ला, अमीत यादव,यांच्यासह औंध गटातील गावांमधील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन संचालक व आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी/ माण (खटाव)
