जावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आलेवाडी शाळेत ख-या कमाईचे धडे !

प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य (काका)


आलेवाडी (जावली) : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आलेवाडी शाळेत आकाशकंदील निर्मिती व पणत्या सजावटीची कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने व एकरुपतेने सहभागी झाले.


आकाशकंदील निर्मितीचा आनंद घेत त्यांनी नवनविन डिझाईन्सचे आकाशकंदील निर्मिले.पणती सजावटीत विद्यार्थ्यांनी लक्षवेधी रंगभरण करत स्वनिर्मितीचा व सृजनशीलतेचा आनंद घेतला. दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. आकाशकंदील व पणती ही दीपावली सणाची प्रतीके. या दोन्ही गोष्टी साकारताना विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट उल्लेखनीय असे आहेत.


कार्यशाळेनंतर विद्यार्थी निर्मिती आकाश कंदील व रंगीबेरंगी पणत्या शिवाजी चौक आलेवाडी येथे विक्रीस ठेवण्यात आल्या. विविध विक्रीस्टाॕल उभारुन विद्यार्थ्यांनी आकाशकंदील व पणत्यांची विक्री केली. शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद देत ही दीपावली प्रतीके आनंदाने विकत घेतली. यानिमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान तपासले व खुश होवून उपक्रमाचे कौतुक केले. 


या उपक्रमास आप्पासाहेब निकम, प्रियांका किरवे व ज्योती राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक नितीन जाधव यांनी स्वनिर्मितीचा आनंद , कष्टाची कमाई या जीवनमूल्यांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. यशस्वी उपक्रमाचे अध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यव. समिती तसेच सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी तोंडभरुन कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / जावली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने