कराड उत्तर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल

प्रतिनिधी : श्री.राहुल पवार 


कराड : तालुक्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब पाटील यांनी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आमदार बाळासाहेब पाटील हे सलग पाच वेळा मतदारसंघावर आमदार म्हणून निवडून आले आहेत मतदार संघावर त्यांची चांगली पकड आहे राज्यामध्ये राजकीय उलाढाल झाली आहे त्यांचे अधिकृत चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाकडे आहे या चिन्हासाठी शरद पवार गटाकडून न्यायालयीन लढाई सुरू आहे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिले आहे यामुळे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यापुढे तुतारी चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे आव्हान आहे परंतु कराड उत्तर मध्ये यावेळी त्यांच्यापुढे भाजप महायुती कडून मनोज घोरपडे यांचं तगड आव्हान आहे परंतु कराड उत्तर मतदार संघातील सुज्ञ मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल कराड उत्तरची निवडणूक आरोप प्रति आरोप गाजणार हे नक्की याची ठिणगी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन यावरून दिसते कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा जोरदार घोषणाबाजी व शाब्दिक वाद निर्माण झाला होता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला परंतु कराड उत्तर मध्ये आरोप प्रत्यारोप यांच्यामुळे आगामी राजकीय वातावरण तापणार हे नक्की असे जाणकार सांगतात.


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने