प्रतिनिधी : संजय वांगडे
कास (जावली) : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठार परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी कास पठार कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या चालू वर्षीच्या हंगामाकरता अध्यक्षपदी कासचे दत्तात्रय किर्दत यांची तर उपाध्यक्षपर एकीवचे प्रदीप कदम यांची निवड करण्यात आली.
यावर्षी मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे हंगाम थोडा लेट होण्याची शक्यता आहे असे चित्र दिसून येत आहे येणाऱ्या हंगामासाठी कास पठार कार्यकारी समितीचे सर्व पदाधिकारी सज्ज आहेत असे चित्र दिसून आले येणाऱ्या पर्यटकां ची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आलेली आहे.
कास पठार कार्यकारी समिती मध्ये कास परिसरातील कास, एकीव् अटाळी, कासाणी, पाटेघर, कुसुंब मुरा या सहा गावांचा समावेश आहे दरवर्षी प्रत्येक गावाला अध्यक्षपदाची संधी दिली जाते. त्याप्रमाणे सर्व गावांना अध्यक्ष निवडून यापूर्वीच सर्व गावांना संधी देण्यात आली होती. यावर्षी कास गावातील दत्तात्रय किर्दत यांना अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. साताऱ्याचे वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी आजी-माजी पदाधिकारी, वनपाल, वनरक्षक उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)
