अंकुशबाबांच्या दातृत्वाने जवळवाडीत उभा राहिला सभामंडप
प्रतिनिधी : संजय वांगडे
मेढा (जावली) : जवळवाडी ता.जावली येथिल हनुमान मंदिरा समोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सभा मंडपासाठी श्री अंकुशबाबा कदम यांनी सहकार्य केल्याने त्यांच्या दातृत्वातून कायम स्वरूपी काम झाले असून या व्यासपिठाचे उदघाटन श्री अंकुशबाबा कदम यांचे शुभहस्ते करण्यात आले.
जवळवाडी येथिल मुंबई मध्ये असणार्या युवक व ग्रामस्थांनी दहिहंडीच्या निमित्ताने एकत्र येत श्री अंकुशबाबा कदम यांची भेट घेवून गणेशोत्सव जवळ आला असून व्यासपिठावर शेड आवश्यक असल्याचे सांगितले क्षणाचाही विलंब न लावता या कामाला मी पूर्ण सहकार्य करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त करून आवश्यक निधी देण्यात आला.अल्पावधित या मंडपाचे काम पूर्ण झाल्याने कदम यांच्या दातृत्वा बद्दल जवळवाडीकरांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले.
या सभामंडपाचा उदघाटन सोहळा श्री अंकुशबाबा कदम यांचे शुभहस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी जेष्ठ नेते एस.एस.पार्टे गुरुजी,शिवसेना तालुका प्रमुख संतोष चव्हाण,संतोष बैलकर, मालचौंडी सरपंच संपत कदम, सुरेशबुवा जवळ,आण्णासाहेब धनावडे,विलासबाबा जवळ, सतिष मर्ढेकर,अशोक जवळ, सचिन जवळ,मंडळाचे अध्यक्ष सागर जवळ,उपाध्यक्ष रमेश पाटील, दत्ताबाबा जवळ, पत्रकार प्रमोद, ग्रामस्थ, महिला,युवक इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अंकुशबाबा कदम म्हणाले जावलीच्या मातीत मी जन्माला आलो.या मातीचे ऋण मला फेडायचे आहेत. जावलीच्या विकासाचा व्हिजन माझ्याकडे असून यासाठी जावलीकरांनी मला आशिर्वाद द्यावेत.यापुढे जावलीतून जास्तीत जास्त अधिकारी तयार व्हावेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना पार्टे गुरूजी म्हणाले जावली ही शुरांची,वीरांची आणि क्रांतीकारकांची भूमी आहे. जावलीच्या मातीत वाघ निर्माण करण्याची ताकद आहे.अंकुशबाबा तुम्ही व्हिजन घेवून पुढे चाला सामान्य जावलीकर आपल्या या लढाईत आपल्या सोबत असतील.विलासबाबा जवळ यांनी आपल्या प्रास्ताविकात जवळवाडी गावचे सण, उत्सव व परंपरा विषद करून इथला युवक जिद्द, चिकाटी व धाडशी असल्याने आभाळाला गवसणी घालण्याची ताकद या मातीत असल्याचे सांगितले.सतिष मर्ढेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करून शेवटी आभार मानले.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)

