मेढा (जावली) : दि.8 सप्टेंबर महाराष्ट्रा मध्ये विविध ठिकाणी घडलेल्या मुलींवरील अत्याचारा विरोधात नेहरू युवा मंडळ कुसुंबी, यांच्या वतीने गणेश चतुर्थी गणराया च्या आगमन, मिरवणुकीच्या सोहळ्यामध्ये मेढा ते क्षेत्र कुसुंबी पर्यंत सामाजिक संदेश असणारे पोस्टर्स दाखवत सामाजिक एकतेचा संदेश देत निषेध करण्यात आला.
बदलापूर मधील एका प्रतिष्ठित शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं. अवघ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. त्यानंतर नागरिक संतप्त झाले. या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशात मोठा तणाव निर्माण झाला होता. रस्त्यावर उतरत नागरिकांनी या घटनेचा निषेध केला होता. घटनेवर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला.
श्री क्षेत्र कुसूंबी येथील काळेश्वरी देवी प्रवेशद्वारापासून ते कुसूंबीचा राजा विराजमान होतो त्या व्यासपीठा पर्यत गावातील जेष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती, महिला जनजागृती मोहीम मध्ये सहभागी झाले होते.
श्री क्षेत्र कुसूंबीच्या जडणघडनी मध्ये मोलाची कामगिरी बजावत असलेल्या नेहरू युवा मंडळ यांच्या वतीने नेहमीच समाजाभिमुख कार्यक्रम हाती घेतले जातात त्यांच्या या जनजागृती कार्याचे तमाम कुसूंबीकर ग्रामपंचायत कुसूंबीचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील,काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष, विश्वस्त, गावातील सर्व मंडळे व विविध स्तरातून राजकीय,सामाजिक क्षेत्रातुन कौतुक होत आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)



