नवी मुंबई : नवी मुंबई हद्दीतील सर्व सिग्नल वर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यासाठी खोदकाम करत असताना पडलेले खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेने मनपा आयुक्त कैलाश शिंदे यांना दिले निवेदन.
नवी मुंबई ने स्वच्छ भारत अभियानात प्रथम क्रमांक मिळविला असून महानगर पालिकेने सुरक्षेच्या कारणास्तव नवी मुंबईतील प्रत्येक सिग्नल वर सी सी टी व्हीं कॅमेरे बसवण्याचे काम ठेकेदारास दिले होते.परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून निकृष्ट. दर्ज्याचे काम करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत असून.
आपण एका बाजूला सुरक्षा व्यवस्था सांभाळत असताना रस्त्यावर केबल टाकण्यासाठी खोदलेले चर व उगड्या असणाऱ्या केबल वारंवार तक्रार करून सुध्दा गेली अनेक महिने तश्याच असून. यामुळे प्रत्येक चौकात वाहन चालकांना नाहक त्रास होत असून खड्यामुळे वाहतूक कोंडी सुध्दा होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सध्या गणपती बाप्पा चे आगमन होत असून नागरिकांना आपला त्रास सहन करावा लागत आहे किमान बाप्पाला तरी या खड्यातून जाताना त्रास होवु नये याची दखल आपणाकडून घेण्यात यावी आणि आपण संबधित विभागाला सांगून तत्काळ कार्यवाही करण्यात यावी .
आमच्या निवेदनाची तत्काळ दखल घेवून योग्य ती कारवाई करून केलेल्या कारवाईचा तपशील आम्हाला लेखी स्वरूपात प्राप्त करून द्यावा. अन्यथा आम्हाला आपल्या विरोधात मनसे स्टाईलने गणपती बाप्पाला सोबत घेवून तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी. बाळासाहेब शिंदे प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना नवी मुंबई
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / नवी मुंबई
