महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील हटिल व्यवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी), कोल्हापूर यांचेकडील तपासास असलेल्या प्रकरणाचा वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. महाबळेश्वर येथील मेघदूत हॉटेलचे मालक यांना मद्य विक्री परवाना मिळवून देतो असे सांगुन आरोपी श्रीकांत कोल्हापूरे याचे मित्र हानुमंत मुंढे व इतर साथीदारांच्या मदतीने हॉटेल मालक यांचा विश्वास संपादन करून दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्च येणार असे सांगितले व त्यांचेकडून एक कोटी पाच लाख रुपये रोखीने व चेकव्दारे घेवुन हॉटेल मालक याची फसवणुक केली आहे.
हॉटेल मालक यांनी आपली फसवणुक झालेचे लक्षात येताच त्यांनी अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे तक्रार केली होती. आर्थीक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी तपास करून गुन्ह्याचे स्वरुप निष्पन्न झाल्यावर नऊ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यापुर्वी हानुमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यु रामदास देडगे व बाळु बाबासाहेब पुरी यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश माळी, पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा कावडे, पोलीस अंमलदार विजय कुभांर, निवृत्ती पाडेकर, चालक जमीर गुल्ला व स्वप्नील जाधव यांनी आरोपीस ठाणे येथे ताब्यात घेतले. वार्ड न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे व गुन्हे अन्वेषण विभाग, (पुणे) पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापुर परिक्षेत्र पोलीस अधीक्षक श्रीमती मनिषा दुबुले तपास करीत आहेत.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / महाबळेश्वर
