बँक नक्की कोणासाठीः नागरिकांचा संतप्त सवाल; बँक अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष
कुडाळ (जावली) : तालुक्यातील कुडाळ गावांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ही एकमेव राष्ट्रीयकृत बैंक असून या बँकेतील अधिकाऱ्यांचे सर्वसामान्यांना सहकार्य होत नसल्याचे जागरिकांमधून बोलले जात आहे लाइकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा हाले आहेत. यांतु केवायसी नसल्यामुळे महिलांना पैसे काढणे अवघड झाले आहे. यामुळे ऐन गणपतीच्या सणासुदीला के.वाय.सी करण्यासाठी महिलांना बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत, बँकेत परिसरातील अनेक खातेधारकांचे खाते असून सर्वसामान्य ग्राहकांना मात्र या ठिकाणी दुजाभावाची वागणूक मिळत आहे.
बँकेत ठेवीदार व धन दांडग्यांना मात्र तत्परतेने मदत केली जाते परंतु सर्वसामान्य खातेदारांना मात्र मेटाकुटीला आणले जात असल्याचे दिसून येत असून त्यांना बैंककडे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी गरज असलेल्या के वाय सी फॉर्म महिलांकडून भरून घेतला जात आहे. पण चार ते पाच दिवस झाले तरी त्यांच्या के वाय सी ची पूर्तता अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत नसल्याचा गंभीर आरोप महिला व नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा बैंक प्रशासनाने तातडीने या महिलांच्या समस्येची दखल घेऊन येथील अधिकाऱ्यांना व कर्मचान्यांना के वाय सी करण्याबाबत सूचना कराव्यात अशी मागणी महिला वर्गातून होऊ लागली आहे.
खाजगी शासकीय कर्मचान्यांचे पगार, पेन्शन जमा होत आहेत. परंतु बँकेतील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेच्या वारंवार पायऱ्या झिझवाव्या लागत आहेत. बैंक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेत कायमच अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बँकेतील समस्यांचा निपटारा करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
तसेच जावली तालुक्यातील बाजार पेठ असणाऱ्या गावांचा विचार करून अजून एक-दोन नॅशनल बँकेच्या मिनी शाखा कुडाळ पंचक्रोशीतील भागात चालू व्हाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याचप्रमाणे कुडाळ गावामध्ये असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम मध्ये कायम वेळेला पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे नागरिकांना पाचवड किंवा मेढा येथील असणाऱ्या एटीएम सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे. वयोवृद्ध व्यक्तींना पैसे काढण्यासाठी किंवा बँकेच्या इतरत्र सुविधा मिळवण्यासाठी तासंतास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे.
त्यामुळे वयोवृद्धांची ही गैरसोय बँकेने दूर करावी. अशा विविध समस्यांचा बँक प्रशासनाने विचार करून तातडीने कुडाळ बँकेतील असणाऱ्या समस्यांचा निपटारा करावा अशी मागणी स्थानिक नागरिक व खातेदार करत आहेत. बँकेच्या मॅनेजरने सहकार्य करावेः खातेदारांची मागणी सद्यस्थितीत कुडाळ शाखेच्या बैंक ऑफ महाराष्ट्र शाखेत असणाऱ्या मॅनेजरने खातेदारांना सहकार्य करावे तसेच सद्यस्थितीत असणाऱ्या बँक मॅनेजरने आजपर्यंत गोरगरिबांची किती कर्ज प्रकरणे मार्गी लावली आहेत याचीही माहिती जिल्हा बँक प्रशासनाने घ्यावी व गोरगरिबांना असणाऱ्या कर्जाची गरज बँकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावी व बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)
