प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोनगाव मधील कचरा डेपो विरोधी मोहिमेच्या बाजूने ठराव

जावली तालुक्यातील सोनगाव गावातील मंजूर झालेल्या कचरा डेपो संदर्भात जो आदेश निघाला आहे या आदेशाला विरोध करण्यासंदर्भात प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोनगाव मधील कचरा डेपो विरोधी मोहिमेच्या बाजूने ठराव

सोनगाव (कुडाळ) : जावली तालुक्यातील सोनगाव गावातील मंजूर झालेल्या कचरा डेपो संदर्भात जो आदेश निघाला आहे या आदेशाला विरोध करण्यासंदर्भात व मुंबई हायकोर्ट येथे जनहित याचिका दाखल करणे व सदर शासकीय आदेशास स्थगिती मिळविण्याकरता श्री.सौरभ बाबा शिंदे (चेअरमन- प्रतापगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनगाव तालुका -जावली ,जिल्हा-सातारा ) यांच्या पुढाकाराने प्रतापगड सहकारी साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने कचरा डेपो विरोधात सोनगाव मधील कचरा डेपो विरोधी मोहिमेच्या बाजूने ठराव देण्यात आला.
सोनगाव मधील रहिवाशांच्या बाजूने या लढ्यामध्ये प्रतापगड सहकारी साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन सौरभ बाबा शिंदे यांच्या वतीने देण्यात आले आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / सोनगाव (कुडाळ)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने