विनय पवार याचे एम.पी.एस.सी परीक्षेत उज्वल यश

प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे

मेढा (जावली) : पिंपरी तालुका जावली गावचे सुपुत्र श्री विठ्ठल पवार सर यांचे चिरंजीव विनय पवार यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रात 39 वा क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. विनयने परीक्षेसाठी अतोनात कष्ट करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उज्वल यश संपादन केले आहे. अतोनात परिश्रम केल्यानंतर यश हे मिळतेच आणि यश मिळाल्यावर जो आनंद मिळतो हा खूप मोठा असतो जो कठोर परिश्रम करतो त्याला यशही नक्कीच मिळते आणि विनय ने ते यश मिळवले आहे. हॅलो विनयचे वडील रयत शिक्षण संस्थेत शिक्षक सेवा बजावत विनयला शिक्षणाचे बाळकडू दिले त्यांनी दिलेल्या संस्कारावर विनयने यश संपादन केले विनयच्या यशाबद्दल समस्त जावली तालुक्यातून तसेच ग्रामस्थ मंडळ पिंपरी, नवजवान तरुण मंडळ पिंपरी, यांच्यामार्फत अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला. विनयचे पिंपरी गावातून ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने