जावलीत "भावी आमदार" असा उल्लेख असणारे झळकले बॅनर चर्चेला उधान

कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जावळीत पुनरावृत्ती होणार का?

प्रतिनिधी : जितीन वेंदे

मेढा (जावली) : सध्या संपूर्ण राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघांवर प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाचे लक्ष कायम लागून राहते ते दोन विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव आणि सातारा.सध्या सातारा-जावली मतदारसंघात मेढा येथे एका नवीन युवा कार्यकर्त्याचे भावी आमदार या आशयाचे २९ ऑगस्टच्या दहीहंडी निमित्त बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे सर्वत्रच भावी आमदार या अशयाचा असणारा बॅनर चर्चेचा विषय होऊ लागला आहे. 

       गत पंचवार्षिकला कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेला फेरबदल असाच फेरबदल यावेळेस सातारा-जावली मतदार संघामध्ये होणार का अशा विविध चर्चांना उधाण येवू लागले आहे. सलग तीन वेळा विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावलीचे नेतृत्व केले आहे. विद्यमान आमदारांनी जावलीमध्ये विकास कामे केली असली तरीही बोंडारवाडी धरण,तालुका क्रिडांगण,मेढा नगरपंचायतीचा डी.पी.आर, करवाढ असे अनेक प्रश्न जैशे थे आहेत.लोक उघड विरोध करीत नसली तरी चार दोन कार्यकर्त्यांचा विकास झालेला लोकांना दिसत असल्याने लोक योग्य संधीची वाट पहात आहेत.

विधानसभेला विद्यमान आमदारांना तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीतून कोण दिला जाणार अशी चर्चा सुरू आहे.यातच मेढ्यामध्ये दहीहंडी निमित्त कार्यकर्त्यांनी मा.अंकुश (बाबा)कदम यांचे भावी आमदार अश्या आशयाचे बॅनर झळकवल्याने वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

जावली विधासभा मतदार संघ सातारा विधानसभेमध्ये विलीन झालेने जावलीतील सामान्य जनता निराश आहे.

मोठमोठे सगळे कार्यक्रम सातार्‍यात होतात पण जावळीत मात्र होत नाहीत?

 यातच जावलीच्या स्वाभिमानाची दहीहंडी भरवली जात असल्याने या बॅनरची चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात होऊ लागली आहे. जावलीतील जनता या भूमिपुत्राच्या पाठीशी ठाम उभी राहून भावी आमदाराला विधानसभेला पाठविणार अशी चर्चा रंगू लागली आहे.



न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / मेढा (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने