जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांना चौकशीचे आदेश.

 


कराड तालुका प्रतिनिधी राहुल पवार


कराड : विद्यानगर बोगस अकॅडमी प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दाखल घेतली असून दरे(महाबळेश्वर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराड विद्यानगर येथील बोगस ६८ अकॅडमी बाबत ‘यशवंत नगरी’ ने चालविलेल्या लेख मालेची प्रत देवून पालकांच्यावर होणाऱ्या आर्थिक पिळवणूक व बोगस अकॅडमी चालकांच्या बाबत वस्तुस्थिती विस्तृत माहिती त्यांना देण्यात आली. कराड विद्यानगर येथील बोगस अकॅडमी ची वस्तुस्थिती वाचून मुख्यमंत्री देखील अवाक झाले.

        आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडून दिली व लाखो उच्च शिक्षित समाजाची पिढी राज्यात निर्माण केली अश्या कराड सारख्या आदर्श विद्यानगर शैक्षणिक परिसरात शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या बोगस अकॅडमी वर त्वरित कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी व सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना त्वरित दिले असून सर्व बेकायदा बाबीची करून बोगस अकॅडमी वर कारवाई करा, असा आदेश दिला आहे.   

                  यावेळी ‘यशवंत नगरी’ शी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सुरू असलेले प्रकार शासन कधीही सहन करणार नाही. माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा ,महाविद्यालय व उच्च शिक्षण या सह शिक्षण संस्था यांच्यावर शासन खाजगी कोचिंग क्लासेस व बोगस अकॅडमी बाबत राज्य शासन लवकरच ठोस निर्णय घेणार असून कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत या प्रश्नावर सविस्तर चर्चा देखील करणार आहे.

            पैसा कमविण्यासाठी अनेक संस्था शिक्षणासारख्या क्षेत्रात येत असून सामान्य शेतकरी,कष्टकरी,मजूर यांना योग्य तो न्याय देण्यासाठी आम्ही राज्य शासन कटिबद्ध आहोत.




कराड मधील बोगस अकॅडमी चे ‘काळे धंदे’ ऐकून मुख्यमंत्री झाले अवाक....



बोगस अकॅडमी चालकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळून पालकांना फसवून याचबरोबर खोटी पावती पुस्तके छापून कोट्यावधी रुपये शासनाचा कोणताही टॅक्स न भरता सुरू केला काळा धंदा ‘यशवंत नगरी’ मधील वृत्त वाचून आश्चर्य चकित झाले. राज्य शासन यावर कडक कारवाई करेल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.




न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / कराड

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने