जावली तालुक्यातील क्षेत्र कुसुंबीत पाणी चळवळीला सुरूवात,अडवणार कोट्यावधी लीटर पाणी,ग्रामस्थांनी केला निर्धार गाव पाणीदार करण्यासाठी



 पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे,जावली सारख्या अतिवृष्टीच्या तालुक्यातही उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे,पावसाळ्यात धो धो पाऊस पडत असला तरी हे पाणी वाहून जात असल्याने दिवाळीनंतर पाण्याची समस्या सुरू होवून उन्हाळ्यात अक्षरशः गंभीर रूप धारण करते. हेच लक्षात घेऊन कुसुंबी ग्रामस्थांनी पाणी चळवळ हाती घेतली असून डोंगर भागात जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत.कुसुंबी गावाला पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे, गावाला लागून असलेल्या डोंगर उतारावर शेकडो हेक्टर पडीक जमिनी आहेत या पडीक जमिनीवर मोठ मोठे चर खोदून पाणी मुरवण्यात येणार आहे, डोंगर उतारावरून वाहुन जाणारे पावसाचे पाणी जमिनी मध्येच मुरवल्याने खालच्या बाजूला असणाऱ्या गाव भागातील जमिनीतील पाणी पातळीत वाढ वाढणार होणार आहे,या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध जलमित्र सुशांत भिलारे यांच्या सहकार्याने रोटरी क्लबच्या माध्यमातून मोठी पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे,कुसुंबी गावचे सरपंच, उपसरपंच यांच्या पुढाकाराने ही चळवळ उभी राहत असून नुकतेच या कामाला उत्साहात सुरुवात झाली,यावेळी पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी : श्री.जितिन वेंदे 

क्षेत्र कुसुंबी तालुका जावली







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने