जावली तालुक्यातील पिंपरीत जननीदेवी माता भक्तांची मांदियाळी,मातेचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न


पिंपरी तालुका जावली येथील जननी माता मंदिर वर्धापन दिनानिमित्त गेली दोन दिवस कार्यक्रम उत्साहात पार पडले, या कार्यक्रमासाठी पिंपरी गावातील माता-भगिनी तसेच पुनर्वसन शहापूर पिंपरी पंढरपूर येथील जननी देवी भक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, गेली दोन दिवस वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडत असतानाच भाविकांनी प्रवचन हरिपाठ कीर्तन सेवेचा लाभ घेतला,वर्धापनाच्या मुख्य दिवशी पिंपरी गावामध्ये दिंडी सोहळ्यामध्ये अनेक भाविक भक्तांनी सहभाग घेतला या वर्धापन दिनानिमित्त ग्रामस्थ तसेच माहेरवाशीन मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आणि या दिंडी सोहळ्यात मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या सोहळ्यासाठी समस्त जावली तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला, गेली दहा वर्षे चालू असणारा हा वर्धापन दिन पिंपरी गावासाठी एक आगळावेगळा सण साजरा केला जातो यानिमित्ताने माहेरवाशी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर यांचे समस्त ग्रामस्थ मंडळ पिंपरी यांच्या वतीने स्वागत आणि सन्मान करण्यात आले तसेच दिंडी सोहळा संपन्न झाल्यानंतर रुपाली साळुंखे यांच्यातर्फे हळदी- कुंकू कार्यक्रम पार पडला, तसेच आलेल्या महिलांना भेट वस्तू देण्यात आली. दिंडी सोहळ्यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.




न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / श्री.संजय वांगडे 

पिंपरी (जावली)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने