बेकायदेशीर उत्खननाची व सांगवी रस्त्याची मुरूम रॉयल्टीची चौकशी करून कारवाई करा -किरण बगाडे

प्रतिनिधी / जावली


सुसाट डंपर वर तहसीलदार साहेब कारवाई करणार का?

जावली : तालुक्यामध्ये दिवसा कमी पण रात्रीचे उत्खननाचे प्रमाण वाढले आहे म्हसवे डोंगर आनेवाडी भाग केळघर बामनोली कुडाळ या विविध डोंगराळ व बाजूच्या ठिकाणी दिवसा नाही पण उत्खननाचा रात्रीस खेळ चाले कार्यक्रम सुरू आहे. 

काही जेसीबी धारकांकडून शासनाला चुना लावण्याचा गोरस धंदा काही राजरोसपणे रात्रीच्या वेळीसुरु आहे शेतकऱ्याला थोडक्यात खुश करून बेकायदेशीरपणे उत्खनन करून स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाच्या महसुलाला चुना लावत आहेत.

परवाच बेलावडे गावच्या हद्दीमधील (माळावर) डोंगरालगत राजरोसपणे मुरूम याची वाहतूक डंपरद्वारे सुरू होती प्रशासनाला चॅलेंज करत राजरोसपणे उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरु होते? बेलावडे गावचे हद्दीमधील उत्खनन करण्यासाठी किती शासनाला रॉयल्टी भरली व तसेच उत्खनन परवाना होता का ? याचा खुलासा व्हावा तसेच ते उत्खनन सांगवी गावच्या रस्त्यावर टाकत असल्याचे बोलले जात आहे मात्र शासनाच्या रस्त्यावर ठेकेदारा ला शासन सर्व बाबींचा विचार करून बिल अदा केले जाते.

मात्र ठेकेदाराने शासनाच्या महसुलला चुना लावत स्वार्थासाठी विना रॉयल्टी चा मुरूम टाकला असून सदर मुरमा ची रॉयल्टी उत्खनन परवाना वाहतूक परवाना याची संपूर्ण चौकशी करून सदर ठेकेदारावर व उत्खनन करणाऱ्या जेसीबी डंपर धारकांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी दिला आहे.


न्युज मराठी लाईव्ह 
जावली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने