श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)
मेढा (जावली) : सातारा जि.प. चा गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमांतर्गत मेढा येथील जि.प प्राथ. केंद्रशाळेत इ. १ ली साठी प्रवेश प्रक्रिया उत्स्फुर्त पणे राबवण्यात आली. इ.१ ली प्रवेशासाठी सकाळीच पालक शाळेत उपस्थित होते. उपस्थित सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचा इ.१ ली चा प्रवेश आंनदायी वातावरणात घेतला. एकूण २५ विद्यार्थांनी प्रवेश घेतला.
याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. रंजना सपकाळ यांनी पी. एम.श्री. शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेत शाळा समाविष्ट असून त्यातील विविध योजना, उपक्रमांचा विद्यार्थ्याना होणारा फायदा सांगितला. तसेच शाळेत उपलब्ध सुविधा, गुणवतापूर्ण उपक्रम, विविध स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, खेळ यातील शाळेने मिळवलेले यश याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
चालू शैक्षणिक वर्षापासून इ.१ ली साठी सी.बी.एस.सी. अभ्यासक्रम लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली. सदर प्रसंगी केंद्रप्रमुख - श्री. सुरेश धनावडे साहेब, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, शा. व्य. समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)

Post a Comment